Stock Market Marathi :अमेरिकेसमोर भारत ताकदीने उभा ! टेरिफ अनिश्चिततेनंतरही सेन्सेक्स २७०.०१ व निफ्टी ६१.२० अंकांने वाढला 'हे' आहे विश्लेषण

  37

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात वाढ झाली आहे. दोन दिवस घसरणीनंतर आज पुन्हा बाजारात वाढ झाल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास बळावल्याची शक्यता आहे. आज युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच भारतावर टेरिफचा निर्णय होईल असे घोषित करतानाच याशिवाय १ ऑगस्टपर्यंत शुल्कवाढ रद्द केल्याने बाजारात भावनिकदृष्ट्या तेजी निर्माण झाली. आशियाई बाजारातील वाढी नंतर आज अखेरीस भारतीय बाजार 'हिरव्या' रंगात बंद झाला. सेन्सेक्स निर्देशांक २७०.०१ अंकाने वाढत ८३७१२.५१ पातळीवर गेला. निफ्टी ५० निर्देशांकात ६१.२० अंकाने वाढ झाल्यावर निफ्टी पातळी २५५२२.५० पातळीवर पोहोचली आहे.सेन्सेक्स बँक निर्देशांकात आज चांगली वाढ झाली. सकाळ प्रमाणेच वाढ अपेक्षित असल्याने निर्देशांक ४६५.१९ अंकांने वाढत ६४०४१.१८ पातळीवर स्थिरावला आहे. बँक निफ्टी ३०७.१० अंकाने वाढत ५७२५६.३० पातळीवर स्थिरावला. सेन्सेक्स मिडकॅपमध्ये ०.०१% वाढ झाली असून सेन्सेक्स स्मॉलकॅपमध्ये ०.१७ % घसरण झाली आहे.

निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) यामध्ये आजही संमिश्र प्रतिसाद राहिला आहे. सर्वाधिक वाढ रिअल्टी (०. ९९%), खाजगी बँक (०.६६%), फायनांशियल सर्विसेस २५/५० (०.६०%) सभभगात वाढ झाली आहे. मात्र सर्वा धिक घसरण कंज्युमर ड्युरेबल्स (२.२९%), हेल्थकेअर (०.८९%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.८३%), मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.८२%), फार्मा (०.८९%) समभागात झाली. आज विशेषतः दुपारच्या सत्रात अस्थिरता निर्देशांकात वाढ कायम राहिली होती किंबहुना ती वाढली आहे. अखेरच्या सत्रात बंद होताना वीआयएक्स (VIX Volatility Index) २.९०% घसरला होता. आज बीएसईचे (BSE) बाजार भांडवल (Market Capitalisation) ४६१.३६ लाख कोटी होते तर एनएसई (NSE) बाजार भांडवल ४५९.१६ लाख कोटी रुपये आहे.

बीएसईत आज ४१६७ समभागापैकी १९६९ समभागात वाढ झाली असून २०६४ समभागात घसरण झाली आहे. म्हणजेच बाजारातील निर्देशांकाने सपोर्ट लेवल राखण्यास विजय मिळवला असलातरी बाजारातील उर्वरित वाढ मिडकॅपमधील घसरणीमुळे स्थिरावली आहे. एनएसईत (NSE) यामध्ये ३०२४ समभागापैकी १३५२ समभागात वाढ झाली आहे तर १५६४ समभागात घसरण झाली आहे. बँक निर्देशांकात झालेल्या मोठ्या वाढीमुळे निर्देशांक सकारात्मक पातळीवर बंद हो ण्यास मदत झाली आहे. ट्रम्प यांच्या १४ देशांच्या टेरिफ निर्णयानंतर भारताविषयी लवकरच निर्णय जाहीर करणार असल्याच्या घोषणेनंतर काही काळासाठी बाजारात धाकधूक वाढली असली तरी १ ऑगस्टपर्यंत टेरिफ मुदतवाढ केल्याने बाजाराला बळ आले. सकाळच्या सत्रात गिफ्ट निफ्टीचा नकारात्मक दबाव निर्माण झाल्याने अस्थिरता कायम होती. मात्र सत्राअखेरीस आशियाई बाजारातील किरकोळ वाढीचाही परिणाम बाजारात जाणवला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आर्थिक वर्ष २६ मधील पहिल्या तिमाहीच्या (Q1) अस्थिरता राहू शकते मात्र भारताचे मूलभूत फंडामेंटल मजबूत स्थितीत असल्याने त्या प्रमाणात भारतीय बाजारावर दिसून आला नाही.

काही कंपन्यांच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax PAT) घसरण तर काही कंपन्यांच्या तिमाही निकालात करोत्तर नफ्यात घट अपेक्षित आहे. श्रेत्रीय संमिश्र प्रतिसाद मिळत असताना मात्र परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची आगामी रोख खरेदी विक्री निर्णायक ठरू शकते. कालच्या अखेरच्या सत्रापर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) यांनी ८५४९.५१ कोटींची रोख विक्री केली असून घरगुती गुंतवणूकदारांनी (Domestic Retail Investors) यांच्याकडून ९१ ०८.६० कोटीची विक्री करण्यात आली आहे. गेल्या दोन तीन दिवसांत परदेशी गुंतवणूकदारांच्या तुलनेत घरगुती गुंतवणूकदार अधिक विक्री करत असल्याने बाजारातील अस्थिरतेचा मूलभूत प्रश्न कायम राहिला आहे.

विशेषतः आज टेरिफ टेंशन मुळे सर्वाधिक परिणाम कंज्युमर ड्युरेबल्स व फार्मा समभागात झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापारीतील अनिश्चितचा फटका या प्रकारच्या समभागात जाणवला. या निर्देशांकात सर्वाधिक तोट्यात अरबिंदो फार्मा (३.४२%), ल्युपिन (२.४९%), ग्रॅन्युल्स फार्मा (२.७४%), झायडस लाईफ (२.२९%) आणि डॉ. रेड्डीज (२.२२%) यांचा समावेश होता. शिवाय,अल्केम फार्मा (१.८%), सिप्ला (१.३२%), ग्लेनमार्क (१.२४%),अ‍ॅबॉट इंडिया (१.२३%)आणि अजंता फार्मा (१.२२%) यांचे शेअर्सही घसरले आहेत.

आज सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. सततच्या डॉलर घसरणीनंतर काल आणि परवा डॉलरमध्ये वाढ झाल्यानंतर सोन्याला सपोर्ट लेवल राखणे शक्य झाले होते. आज पुन्हा एकदा गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Future Index) यामध्ये संध्याकाळपर्यंत ०.३०% घसरण झाली होती जी सकाळी ०.०४% वाढ झाली होती.अखेरच्या सत्रापर्यंत डॉलरचा तुलनेत रूपयात २२ पैसे वाढ झाल्यानेही डॉलरच्या घसरणीचा फायदा भारतीय बाजारात झाला. यामुळे आजही परदेशी गुंतवणू कदारांनी रोख खरेदीत वाढ केल्याची शक्यता नाकारता येणार नाही. संध्याकाळपर्यंत WTI Futures या कच्च्या तेलाच्या निर्देशांकात ०.३४% घसरण व Brent Future Index यामध्ये ०.१६% घसरण झाली असल्याने कच्च्या तेलाचे भाव मर्यादितच राहिले आहेत. ओपेकने पुढील महिन्यात उत्पादनात वाढ करण्याचे निश्चित करतानाच टेरिफ घोषणा १ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आल्यानंतर कच्चे तेल स्वस्त होत आहे.

अमेरिकन बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.०७%), एस अँड पी ५०० (०.७९%), नासडाक (०.९२%) या तीनही बाजारात घसरण झाली आहे. युकेशी डील नक्की झाल्यानंतर युरोपियन बाजारातील एफटीएसई (०.१५%), डी एक्स (DAX ०.३५%) बाजारात वाढ झाली आहे. केवळ सीएसी (CAC ०.०५%) बाजारात नुकसान झाले. आशियाई बाजारात अखेरीस समाधानकारक प्रतिसाद मिळाला आहे. तैवान वेटेड (०.३०%), सेट कंपोझिट (०.६६%) वगळता इतर सर्व बाजारातील निर्देशांकात वाढ झाली आहे. ज्यामध्ये सर्वाधिक वाढ कोसपी (१.७८%), शांघाई कंपोझिट (०.७०%), हेगंसेंग (१.०८%), गिफ्ट निफ्टी (०.३४%), निकेयी २२५ (०.२५%) बाजारात झाली आहे.

आगामी काळातील परिस्थितीवर पुढील बाजाराची दिशा अवलंबून असेल. प्रामुख्याने टेरिफ निकालानंतर यांचा सर्वाधिक परिणाम बाजारावर होणे अपेक्षित आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतासह ब्रिक्स राष्ट्रांना १०% अतिरिक्त शुल्क आकारणी करण्याची धमकी दिल्यानंतर अस्थिरता अजूनही घोंगावत आहे. असे असताना जेन स्ट्रीट प्रकरणानंतर गुंतवणूकदारांना ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये १ लाख कोटीहून अधिक नुकसान झाल्यामुळे मिडकॅपवर दबाव कायम होत आहे.

बाजारातील तरलता (Liquidity) वाढल्याने तसेच कर्ज प्री पेमेंट शुल्कावर आरबीआयने बंदी आणल्यावर त्याचा फायदा बँक निर्देशांकात जाणवत होता. सततच्या बँक निर्देशांकात होत असलेल्या घसरणीनंतर आज वाढ झाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण कायम राहिले.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ अलोक इंडस्ट्रीज (१०.४१%), लेमन ट्री हॉटेल (५.८४%), सोनाटा सॉफ्टवेअर (५.१७%), वारी एनर्जीज (५.०५%), एनएचपीसी (४.१६%), सीएट (४.०१%), आयआयएफएल फायनान्स (३.११%), विशाल मेगा मार्ट (१.९६%), एमआरएफ (१.३८%), अनंत राज (१.३५%), कोटक महिंद्रा बँक (३.४७%), इन्फोऐज (१.९४%), एशियन पेंटस (१.७१%), सिमेन्स एनर्जी इंडिया (१.५६%), ग्रासीम इंडस्ट्रीज (१.५०%), भारत पेट्रोलियम (१.४६%), स्विगी (१.२७%), भारत इलेक्ट्रॉनिक्स (१.१७%) समभागात वाढ झाली आहे.

तर सर्वाधिक घसरण टायटन कंपनी (५.८५%), बजाज होल्डिंग्स (२.८४%), होंडाई मोटर्स (२.१९%), टीव्हीएस मोटर्स (१.६१%), झायडस लाईफसायन्स (१.५६%), बजाज ऑटो (१.४७%), सिप्ला (१.४७%), युनायटेड स्पिरीट (१.२९%), ट्रेंट (१.०७%), हिंदाल्को (०.९४%), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (०.७६%), सीजी पॉवर (०.६८%) समभागात झाली आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले की,' संपूर्ण जगातील शेअर बाजारात तसेच कमोडिटी,बुलियन मार्केट हे अनिश्चित वातावरणात कामकाज करण्यात येत आहे. इंडो नेशिया आणि जपान या देशातील टेरिफ करार एकतर्फी झालेले दिसतात. या दोन्ही देशांनी २५% टैरिफ अमेरीकेला एक्सपोर्ट करताना देणे आहे. अमेरीका एक्सपोर्ट करताना टेरिफ देणार नाही.ट्रम्पची मनमानी टेरिफ सुरू झाली आहेत. ब्रिक्स देशांना १०% अधिक टैरिफ लावणार असल्याचे जाहीर केले आहे. काल अमेरिकेतीत बाजार कोसळलेले आहेत. अशाही परिस्थितीत आपला बाजार स्थिर आहे हे विशेष. NCLT मधे जेपी असोसिएटस ही कंपनी दिवाळखोर म्हणुन घोषित होउन त्याचे वसुली प्रक्रिया सुरू झाली आहे .त्यात अदानी कंपनीने सर्वात जास्त बोली लावली असल्याचे बातम्यात येत आहे त्यामुळे आज जेपी असोसिएट,पाॅवर तेजीत होते. एखाद्या कंपनी विशेष नुसार बाजारात कामकाज ढकलले जात असल्याचे जाणवते आहे. अजून एक -दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीचे तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक सुंदर केवात म्हणाले की,'अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १४ देशांवर २५-४०% कर लादण्याच्या घो षणेमुळे निर्मा ण झालेल्या जागतिक अनिश्चिततेनंतरही, भारतीय शेअर बाजार सपाट उघडले आणि संपूर्ण सत्रात मोठ्या प्रमाणात बाजूला व्यवहार झाले. निफ्टी (Nifty) २५,४२७ वर उघडला, दिवसाच्या आत २५,४९५ चा उच्चांक गाठला आणि २५,४२४ चा निचांकी टप्पा गाठला. क्षेत्रनिहाय, रिअल्टी, बँकिंग आणि वित्तीय सेवांमध्ये ताकद दिसून आली, तर ग्राहक टिकाऊ वस्तू,औषधनिर्माण,आरोग्यसेवा आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात कमी कामगिरी दिसून आली.

डेरिव्हेटिव्ह्ज विभागात, TITAN, BSE, 360ONE, ANGELONE आणि DIVISLAB सारख्या स्टॉकमध्ये लक्षणीय ओपन इंटरेस्ट बिल्डअप दिसून आले. आठवड्याच्या समाप्तीसाठी, कॉल साईडवर सर्वाधिक ओपन इंटरेस्ट २५,५०० स्ट्राइकवर आहे, तर पुट साईड २५,५०० आणि २५,४०० वर महत्त्वपूर्ण पोझिशन्स पाहत आहे, जे घट्ट श्रेणी दर्शवते. पुट-कॉल रेशो (पीसीआर) ०.७८ वर कायम आहे, जो नजीकच्या काळात थोडा मंदीचा इशारा देतो.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की, 'भारत-अमेरिका व्यापार करारावर निश्चित प्रगतीची गुंतवणूकदारांना वाट पाहत असल्याने भारतीय शेअर बा जार मोठ्या प्रमाणात मर्यादित राहिला. संभाव्य कराराबद्दल भावना सावधपणे आशावादी असताना, औपचारिक पुष्टीकरणाच्या अभावामुळे नवीन खरेदी क्रियाकलापांवर मर्यादा आल्या आहेत. शिवाय, प्रमुख व्यापारी भागीदारांवर २५% कर लागू करण्याची अंतिम मुदत वाढवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांनी अधिक बचावात्मक दृष्टिकोन स्वीकारला आहे. Q1FY26 च्या उत्पन्न हंगामाजवळ येताच, बाजाराचे लक्ष कॉर्पोरेट कामगिरी आणि व्यवस्थापन भाष्य यावर वळण्याची अपेक्षा आहे, जे भविष्यातील बाजाराच्या गतीला मार्गदर्शन करेल.'

आजच्या बाजारातील रूपयांच्या स्थितीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की, 'रुपया मजबूत व्यवहार करत होता जो ०.२० रुपये किंवा ०.२३% वाढून ८५.६५ वर बंद झाला. कच्च्या तेलाच्या (Crude) किमती कमी झाल्यामुळे आणि एफआयआय विक्रीचा दबाव कमी झाल्यामुळे चलनाला पाठिंबा मिळाला. अमेरिकेसोबतच्या संभाव्य व्यापार करारांबद्दल बाजारातील आशावादामुळेही भाव वाढला. नजीकच्या काळात रुपया ८५.२५ ते ८६.०० च्या श्रेणीत स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.'
Comments
Add Comment

Bharat Bandh News : उद्या भारत बंदची मोठी घोषणा, शाळा, बँका... काय काय बंद राहणार?

२५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार नवी दिल्ली : बँका, विमा, टपाल, कोळसा खाणी, महामार्ग आणि बांधकाम क्षेत्रातील अंदाजे

Mangalprabhat Lodha : आदित्य ठाकरेंकडून रोहिंग्या-बांग्लादेशींच्या झोपड्यांना वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न का? मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा रोखठोक सवाल

कुर्ला आयटीआय परिसरात पारंपरिक खेळाचे मैदान उभे राहणार : मंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई : कुर्ल्यातील महाराणा

Federal Bank Marathon: फेडरल बँक पुणे मॅरेथॉनच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी आजपासून नावनोंदणीस प्रारंभ

येत्या २३ नोव्हेंबर २०२५ ला स्पर्धेचे आयोजन पुणे:सह्याद्री रन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेडरल बँक पुणे

Devendra Fadanvis : सरन्यायाधीश भूषण गवईंचा हा सत्कार फक्त विधीमंडळाकडून नव्हे तर १३ कोटी जनतेकडून – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : आज महाराष्ट्र विधीमंडळात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी

सरन्यायाधीश भूषण गवईंचे भावनिक भाषण

मुंबई : राज्याच्या विधीमंडळात सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र

महिला मतदारांनी लेखी निवेदन दिल्यास 'दारूबंदी'

खारघर परिसरातील दारूबंदीचे निवेदन प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करणार - उपमुख्यमंत्री