अमेरिकेतील टेक्सासमधील महापुरात १०० हुन अधिक लोकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता


वॉशिंग्टन : अमेरिकेतील टेक्सासमध्ये मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरात आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता आहेत.टेक्सासमध्ये लहान मुली उन्हाळी कॅम्पिंगसाठी गेल्या होत्या. त्या देखील बेपत्ता आहेत. लोकांना वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पूरग्रस्त भागाचा दौरा करण्याची शक्यता आहे.


केर काउंटी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प मिस्टिक आणि इतर अनेक उन्हाळी शिबिरे असलेल्या केर काउंटीमध्ये हा पूर आला आहे. या भागात २८ मुलांसह ८४ लोकांचे मृतदेह सापडले आहेत.


मध्य टेक्सासमध्ये आतापर्यंत मृतांची संख्या किमान १०४ वर पोहोचली आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट स्थानिक आणि संघीय हवामान सेवांनी पूर येण्यापूर्वी केर काउंटीला पुराचा इशारा दिला होता असे म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या आठवड्याच्या अखेरीस टेक्सासमधील पूरग्रस्त भागाला भेट देतील, असे त्या म्हणाल्या.


शुक्रवारी(दि.४) सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे, ग्वाडालुपे नदीची पाण्याची पातळी अवघ्या ४५ मिनिटांत २६ फूट (सुमारे ८ मीटर) वाढली होती. यामुळे अचानक पाण्याचा लोंढा परिसरात घुसला. यामुळे कॅम्पिंगसाठी राहत असलेल्या भागात पाणी भरले आणि यात मुलांचा बुडून मृत्यू झाला.


Comments
Add Comment

डोनाल्ड ट्रम्प यांना २४ तासात उपरती; म्हणाले, मोदी उत्कृष्ट आणि महान पंतप्रधान

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आपली

इम्रान खान यांच्या बहिणीवर फेकली अंडी!

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बहिणीवर अंडी फेकण्यात आल्याची

नेपाळमध्ये फेसबुक आणि यूट्यूबसह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी

काठमांडू : नेपाळमध्ये फेसबुक,व्हॉट्सअॅप आणि एक्ससह २६ सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

Afghanistan Earthquake: २२०० जणांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये भूकंप, अन्न आणि औषधांचा प्रचंड तुटवडा

काबूल: जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसच्या मते, गुरुवारी आग्नेय अफगाणिस्तानला ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप आला.

"पंतप्रधान मोदी खूपच हुशार" अमेरिकन गृह विभागाच्या माजी अधिकाऱ्याने ट्रम्प यांना भारताची माफी मागण्याचे केले आवाहन

टॅरिफ शून्य करून भारताची माफी मागण्याचे एडवर्ड प्राइस यांनी डोनाल्ड ट्रम्पना केले आवाहन वॉशिंग्टन:

Bomb Blast in Pakistan: पाकिस्तानात राजकीय रॅलीनंतर बॉम्बस्फोट, १४ जण ठार तर ३५ जण जखमी

कराची: पाकिस्तानमध्ये दररोज कुठे ना कुठे बॉम्बस्फोटाच्या घटना घडत आहेत. त्यानुसार काल रात्री पुन्हा एकदा