Gold Silver Rate: सोने झळकले ! कालच्या जोरदार घसरणीनंतर आज जोरदार वाढ! चांदीच्या किंमत मात्र स्थिर 'हे' कारण जबाबदार

प्रतिनिधी: सोन्याच्या दराने सराफा बाजारात जोरदार पुनरागमन केले आहे. सोन्याच्या कालच्या घसरणीनंतर पुन्हा एकदा पुनरागमन करत सोने झळकत आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमदरात ५५ रूपयांनी, २२ कॅरेट सोन्यात प्रति ग्रॅम ५० रूपये, १८ कॅरेट प्रति ग्रॅम दरात ४१ रूपये वाढ झाली आहे. पर्यायाने सोन्याचे दर प्रति २४ कॅरेट ९८८४ रूपये,२२ कॅरेट सोने ९०६० रूपये, १८ कॅरेट सोने ७४१३ रूपये प्रति ग्रॅमवर पोहोचले आहे.


माहितीनुसार, २४ कॅरेट प्रति तोळा किंमत ५५० रूपयांने वाढत ९८८४० रूपयांवर पोहोचले तर २२ कॅरेट प्रति तोळा किंमत ५०० रूपांने वाढत ९०६०० रूपये, १८ कॅरेट प्रति तोळा किंमत ४१० रूपयांने वाढत ७४१३० पातळीवर दरपातळी पोहोचली. सोन्याच्या जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात (Gold Future Index). सकाळच्या सत्रात ०.०४% वाढ झाली तर युएस गोल्ड स्पॉट दरात ०.१२% घसरत ३३३.५३ प्रति डॉलरवर पोहोचला होता. एमसीएक्सवरील (Multi Comm odity Exchange MCX) यामध्ये सोन्याच्या निर्देशांकात ०.१४% घसरण झाल्याने दरपातळी ९७१३८.०० रूपयांवर गेली आहे.


बाजारातील माहितीनुसार, मुंबई, पुण्यासह बहुतांश प्रमुख शहरातील सराफाबाजारात प्रति ग्रॅम किंमत २४ कॅरेटसाठी ९८८४, २२ कॅरेटसाठी ९८८४, तर १८ कॅरेटसाठी ७४७५ रूपयावर किंमत पातळी आहे. सोन्याच्या दरात घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे ट्रम्प यांनी आता ९ जुलैऐवजी १ ऑगस्टपर्यंत टेरिफवाढ सवलतीची अंतिम मुदत वाढवली आहे. त्यामुळे सोन्याच्या सातत्याने चालू असलेल्या चढ उतारमुळे सोनाच्या किंमती वाढत अथवा कमी होत असल्याचे दिसून आले होते. काल सोन्यात दरात मोठी घसरण झाली होती २४ कॅरेट सोन्यात तर काल ५४ रूपये प्रति ग्रॅमने घसरण झाली. युएस अनपेक्षित पेरोल आकडेवारी आल्यानंतर अमेरिकन बाजारातील सकारात्मतेबरोबर सोन्याच्या व डॉलरला काल सपोर्ट लेवल प्राप्त झाली होती. आज आंतरराष्ट्रीय बाजारातील काही प्रमाणात दबाव गेल्याने सोन्याच्या मागणीत घट झाली होती. परिणामी ते काल स्वस्त झाले.


जवळच्या काळात सोन्यात घसरण झाली असली तरी, दीर्घकालीन मूलभूत बाबी मजबूत आहेत. अलीकडच्या वर्षांत जागतिक मध्यवर्ती बँका आक्रमकपणे सोने खरेदी करत आहेत, फक्त २०२४ मध्येच ८४ अब्ज डॉलर्सची खरेदी झाली जी २००० ते २०१६ पर्यंतच्या एकूण सोने खरेदीच्या क्रियाकलापांच्या जवळपास समतुल्य आहे. डीएसपी म्युच्युअल फंडच्या जुलै २०२५ च्या नेत्रा अहवालात असे दिसून आले आहे की २०२२ पासून, मध्यवर्ती बँकांनी दरवर्षी सुमारे १,००० टन सोने सातत्याने मिळवले आहे, जे वार्षिक जागतिक खाण उत्पादनाच्या एक चतुर्थांश पेक्षा जास्त आहे.


अहवालात असेही अधोरेखित केले आहे की भारताकडे जगातील २३ ट्रिलियन डॉलर्सच्या सोन्याच्या बाजारपेठेतील १५ टक्के हिस्सा आहे. रिझर्व्ह बँकेकडे सध्या ८८० मेट्रिक टन सोने असले तरी, आर्थिक वर्ष २६ मध्ये त्याच्या साठ्यात कोण तीही भर पडलेली नाही, भूराजकीय तणाव आणि व्यापार अनिश्चिततेमुळे पाच वर्षांच्या तीव्र तेजीनंतर सुधारणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज पुरवठ्याच्या तुलनेत मागणीही वाढ झाल्याने सोन्यात आज दरवाढ झाली आहे.


चांदीच्या प्रति ग्रॅम दरात सलग तिसऱ्यांदा स्थिरता कायम आहे व चांदी किंमतीत कुठलीही वाढ अथवा घसरण झालेली नाही. त्यामुळे चांदीचे दर प्रति ग्रॅम ११० रूपये व एक किलोसाठी १११००० रूपये दर सुरू आहे. प्रमुख शहरांत चांदीचे दर १० ग्रॅमला १२०० रूपये तर एक किलो ११०००० ते १२०००० रूपयांवर स्थिरावले आहे. चांदीच्या निर्देशांक सिल्वर फ्युचर निर्देशांक (Silver Future Index) सकाळी ०.७६% वाढ झाली. तर एमसीएक्सवरील चांदीच्या निर्देशांकात ०.१०% वाढ झाल्याने एमसीएक्सवरील चांदीच्या दरात ०.१०% वाढ झाली. मध्यपूर्वेकडील युद्धविरामानंतर चांदीच्या औद्योगिक मागतीतही घट झाल्याने सद्य स्थितीततील किंमत काही काळ स्थिर राहिली अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

आताची सर्वात मोठी बातमी: महाराष्ट्रातील १९१४२ कोटींच्या ग्रीनफिल्ड नाशिक- सोलापूर- अक्कलकोट कॉरिडॉरला केंद्र सरकारची मान्यता

मुंबई: युनियन कॅबिनेट मंत्रालयाने झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील १९१४२ कोटींच्या सहापदरी ग्रीनफिल्ड हायवे

Navnath Ban : संजय राऊत म्हणजे ‘पोपटलाल’, त्यांना मुंबईत ‘खान’ महापौर करायचा आहे; भाजप नेते नवनाथ बन यांचा टोला

“पत्राचाळीत मराठी माणसाला कुणी देशोधडीला लावलं?” मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीत आता वैयक्तिक

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सिगारेट तंबाखू कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण

मोहित सोमण: केंद्र सरकारने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांवर ४०% अतिरिक्त भार लावण्यास मान्यता दिल्याने आज सिगरेट

Eknath Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची आर्थिक झेप अभिमानास्पद

मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले रक्तदान स्वर्गीय दिघे साहेबांची परंपरा

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो बँक बॅलेन्स तपासा! खात्यात नेमके किती हप्ते जमा झाले? पहा सरकारची नवीन वर्षाची भेट

मुंबई : राज्यभरातील 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी वर्षाच्या शेवटच्या दिवशी संमिश्र

Sin Goods Tax Hike: 'शौक' बडी महेंगी चीज हे! तंबाखू गुटखा सिगारेट फेब्रुवारीपासून पराकोटीच्या 'महाग' ४०% अतिरिक्त कर लागू

नवी दिल्ली: शौक बडी महेंगी चीज हे! असे आता म्हणावे लागणार आहे. तंबाखू गुटखा, सिगारेट, व तंबाखूजन्य पदार्थांवर