अमरावती जिल्ह्यात शिवसेना मजबूत, उबाठाला खिंडार

माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचा शिवसेनेत प्रवेश


मुंबई: अमरावतीचे माजी मंत्री जगदीश गुप्ता यांच्यासह माजी महापौर, ३ माजी स्थायी समिती सभापती, माजी विरोधी पक्ष नेता आणि ७ माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी खासदार आनंदराव अडसूळ, कॅप्टन अभिजीत अडसूळ, प्रिती बंड, शिवसेना सचिव राम रेपाळे आदी उपस्थित होते. आजच्या पक्ष प्रवेशाने अमरावती जिल्ह्यात शिवसेना मजबूत झाली असून उबाठाला खिंडार पडले आहे.


माजी मंत्री जगदिश गुप्ता हे दोन वेळा विधानसभेचे आणि दोन वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. ते अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्यासोबत माजी महापौर नितीन वानखेडे, माजी स्थायी समिती सभापती नितीन चांडक, राजू राठी, विलास रोंधे, माजी विरोधी पक्ष नेता सुरेंद्र पोपली यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर मनीष जोशी, सुभाष रत्नपारखी, प्रशांत महाजन, अनिल कडू, भास्कर मानमोडे, वासुदेव देऊळकर, डॉ. राजेश जयपूरकर या ७ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. अग्रवाल समाजाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष किशोर गोमंतका, खामगाव अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष मनोज खंडेलवाल, मराठा महासंघाचे अमरावती अध्यक्ष गणेशराव रेखे, शाहुसमाजाचे अमरावती अध्यक्ष रामचंद्र गुप्ता यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.


यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शिवसेना हा काम करणारा पक्ष आहे. लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा पक्ष अशी शिवसेनेची ओळख आहे. घरी बसून सरकार चालवता येत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. आजच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना अमरावती जिल्ह्यात मजबूत झाली आहे. अमरावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, असे ते म्हणाले. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना कल्याणकारी योजना राबवल्या. त्यामुळे राज्यातील मतदारांनी महायुतीला ऐतिहासिक बहुमत दिले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


यावेळी पालघर जिल्ह्यातील एकता वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अमोल पाटील, उपाध्यक्ष भावेश संख्ये, प्रतीक जोशी, सुमीत बारी, मारुती आव्हाड, सोहम राजपूत यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते एकता वाहतूक संघटनेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

Comments
Add Comment

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देणार

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून यासाठी पंतप्रधान

'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस ‘मातोश्री’त का ठेवला ?' नार्को टेस्ट कराच!

बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावरुन नवा वाद, रामदास कदमांनी दिली धक्कादायक माहिती मुंबई : गोरेगावच्या नेस्को

ठाकरे बंधूंच्या 'युती'आधीच राजकीय 'बॉम्ब'! 'युती'चा सस्पेन्स कायम!

महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने धुरळा नव्हे तर चक्क चिखलफेक पहायला मिळाली. सर्वांचं

'उद्धव ठाकरेंनी माझे हजार रुपये वाचवले' फडणवीसांची मार्मिक टिप्पणी

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कात केलेल्या भाषणावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता मुख्यमंत्री

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा

'व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा आणि फेसबुक लाईव्ह करणारा मी नाही,' एकनाथ शिंदेंचा पलटवार मुंबई: दसऱ्याच्या

'असे हलके वागणारे माझे नाहीत!' गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर पंकजा मुंडे कडाडल्या

भगवान गडाचा वारसा हिरावून घेणाऱ्यांवर पंकजा मुंडेंचा हल्लाबोल बीड: