Federal Bank Marathon: फेडरल बँक पुणे मॅरेथॉनच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी आजपासून नावनोंदणीस प्रारंभ

  80

येत्या २३ नोव्हेंबर २०२५ ला स्पर्धेचे आयोजन

पुणे:सह्याद्री रन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेडरल बँक पुणे मॅरेथॉनची व्दितीय आवृत्ती येत्या २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या स्थळी आयोजित केली जात असून या मॅरेथॉनसाठी नावनोंदणीला आज शुभारंभ करण्यात आला. स्ट्रायडर्सच्या सहकार्याने फेडरल बँक पुणे मॅरेथॉन आयोजित केली जाणार आहे. पुणेकरांचा सळसळता उत्साह, निसर्गरम्य सौंदर्य आणि फिटनेसच्या बाबतीत वाढती जागरुकता साजरी करण्याचे या मॅरेथॉनचे मुख्य उद्दिष्ट आहे.

या स्पर्धेत चार गट आहेत. पूर्ण मॅरेथॉन (४२ किमी), हाफ मॅरेथॉन (२१ किमी), १० किमी आणि ५ किमी असे चार गट असून यासाठी नोंदणी शुल्क आहे. स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छुक असलेले धावपटू

https://stridersevents.in/events/info?FederalBankPuneMarathon2025 येथे ऑनलाईन नोंदणी करू शकतात.

या मॅरेथ़ॉन रनचे ब्रँड अँबेसेडर आणि अभिनेता मिलिंद सोमण म्हणाले, 'फेडरल बँकेच्या पहिल्या आवृत्तीत अविश्वसनीय ऊर्जा आणि सहभाग होता. पुणे खरोखरच एकत्र धावणारे शहर आहे, हे त्या मॅरेथॉन रनमधून सिध्द झाले. या मॅरेथॉन रनच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. अनुभवी धावपटू आणि पहिल्यांदा धावणाऱ्यांना या रनसाठी नावनोंदणी करण्यासाठी त्याचबरोबर या प्रेरणादायी आयोजनाचा भाग होण्यासाठी मी सर्वांना आमंत्रित करत आहे. यंदाची सह्याद्री मॅरेथ़ॉन ही आपण सारेजण आणखी भव्य, सक्षम आणि अविस्मरणीय बनवू या.'

स्पर्धेबाबत माहिती:

* दिनांक: २३ नोव्हेंबर २०२५

* स्थळ: पुणे

* शर्यतीचे गट: पूर्ण मॅरेथॉन (४२ किमी), हाफ मॅरेथॉन (२१ किमी), १० किमी आणि ५ किमी

* नोंदणी शुल्क: ६०० रुपये जीएसटीसह

फेडरल बँकेचे मुख्य विपणन अधिकारी (Chief Marketing Officer) एम. व्ही. एस. मूर्ती म्हणाले, 'मॅरेथॉन रनच्या पहिल्या आवृत्तीला आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सीझन टू अधिक भव्य, धाडसी आणि अधिक उत्साहवर्धक करण्याचे आश्वासन मी देत आहे. आम्ही सर्व उत्साही मॅरेथॉन धावपटूंना २३ नोव्हेंबर रोजी या सोहळ्यात सामील होण्यासाठी आमंत्रित करत आहे.'
Comments
Add Comment

Vastu Tips: सायंकाळी किंवा रात्री दान करू नयेत या गोष्टी, अन्यथा देवी लक्ष्मी होते नाराज!

मुंबई : हिंदू धर्मग्रंथ आणि वास्तुशास्त्रानुसार, काही विशिष्ट गोष्टी सूर्यास्तानंतर किंवा रात्रीच्या वेळी दान

दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप

मुंबई : दीड दिवसांच्या गणरायांना साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. गणरायाच्या निरोपाला रिमझिम पावसाच्या सरी

डॉकयार्ड रेल्वे स्टेशन तरुण मृतदेह प्रकरणी तिघांना अटक

मुंबई (प्रतिनिधी) : डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळील माझगाव परिसरात मंगळवारी एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ

मुंबई : २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील विविध शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी

मुस्लिम असल्याने मला ट्रोल करतात : शमी

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अगामी आशिया चषकासाठी निवड न झाल्याबद्दल

पीव्ही सिंधू बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वार्टर फायनलमध्ये

पॅरिस : दुहेरी ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधूने बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वार्टर