महाराष्ट्र विधिमंडळाच्यावतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार

  66

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्यावतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. याआधी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भूषण गवई यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला.

विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात दोन्ही सभागृहांचे आमदारांच्या उपस्थितीत सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार झाला. यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भारताचे संविधान या विषयावर आमदारांना मार्गदर्शन केले.

राज्यातील अमरावती जिल्ह्यात २४ नोव्हेंबर १९६० रोजी भूषण गवई यांचा जन्म झाला. ते १४ नोव्हेंबर २००३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश झाले. नंतर १२ नोव्हेंबर २००५ रोजी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश करण्यात आले. भूषण गवई यांनी १४ मे २०२५ रोजी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.

भूषण गवई यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई राज्याच्या विधानपरिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी बिहार, सिक्किम आणि केरळ या तीन राज्यांमध्ये वेगवेगळ्या कार्यकाळात राज्यपाल म्हणून काम केले होते. रामकृष्ण सूर्यभान गवई हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या गवई गटाचे संस्थापक होते.

कोण काय म्हणाले ? महत्त्वाचे मुद्दे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आपल्या राज्याचे सुपुत्र असलेले भूषण गवई हे देशाचे सर न्यायाधीश झाले

भूषण गवई हे सर न्यायाधीश. झालेत त्यांचा सत्कार करायला हवा असे आम्ही ठरवले

भूषण गवई यांच्यामध्ये साधेपणा आहे

दादा साहेब गवई यांचा विधिमंडळाशी वेगळा संबंध होता

समाजातील प्रत्येक व्यक्तीला दादा साहेब यांच्याकडे जाता येत होते आज भूषण गवई देखील तसेच आहेत

गवई ज्यावेळी सरकारी वकील होते तेव्हा नागपूर झोपडपट्टीचा विषय होता नागपूरचे सर्व आमदार चिंतेत होते मात्र गवई यांनी तो प्रश्न सोडवला

वन विभागामुळे अनेक रस्त्यांची कामं रखडली होती मात्र गवई साहेबांनी त्यातून मार्ग काढला
त्यांनी लँडमार्क जजमेंट दिलं आणि त्याचा फायदा झाला
हायकोर्टात असताना ही वकिलांच्या बाजूने ते असायचे
आजही वकिलांच मतदान घेतल तर त्यांना तीन चतुर्थांश मतदान होईल
एकही शनिवार किंवा रविवार ते दिल्लीत नाहीत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात ते असतात
दिक्षाभूमी उभी करण्याचं काम दादासाहेब यांनी केलं

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आजचा दिवस आपल्या सर्वासाठी आनंदाचा आहे

आपल्या परिवारातील एक व्यक्ती देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसलीय

भूषण गवई यांनी चौदा मे रोजी शपथ घेतली

कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी काम केले

देशाला एक अस्सल हिरा मिळालाय

एवढ्या मोठा पदावर असून देखील त्यांच्यात एक शालिनता पहायला मिळाली

सर्वोच्च पदावर असूनही जमिनीवर पाय असलेले असे त्यांचे व्यक्तिमत्व.

उपमुख्यमंत्री अजित पवार

आपल्या सेंटर हॉलमध्ये अनेक सत्कार झाले पण आजच्या सत्काराची विधिमंडळामध्ये ऐतिहासिक नोंद होणार आहे

आजच्या भाषणाची सुरुवात माय लॉर्ड अशी करायला हवी होती

प्राथमिक शाळेतील मुलांना मातृभाषेत शिक्षण द्यायचे की नाही असा वाद आता सुरू आहे

लोकशाहीला अधिक बळकट करणारी अशी व्यवस्था आहे

लोकशाही व्यवस्थेत सर्वात मोठी जबाबदारी ही सरन्यायाधीश यांची असते.

अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता, विधानपरिषद

भूषण गवई यांचा आपण सत्कार करतोय

दोन्ही सभागृहाचा मी एकटाच विरोधी पक्ष नेता आहे

काल परवा कुणी तरी मराठी बद्दल बोललं पण दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे भूषण गवई यांनी दाखवून दिलेय

मराठावाडा आणि विदर्भातली माती काही वेगळी नाही

भूषण गवई आपल्या देशाचे सरन्यायाधीश झालेत

सरकार विधिमंडळ आणि न्याय पालिका समतोल असायला हवे

भूषण गवई यांनी प्राथमिक शिक्षण मराठी भाषेत घेतले

मराठी भाषेत शिक्षण घेतलेला व्यक्ती देखील देशाच्या सर्वोच पदावर जाऊ शकतो हे भूषण. गवई यांनी दाखवून दिले

कायद्यानुसार न्याय देणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे

आज राज्याची मराठी म्हणून लता मंगेशकर यांनी नाव उज्ज्वल केलेय

https://www.youtube.com/live/_rX7vg8yz4g
Comments
Add Comment

Pratap Sarnaik: "मी मंत्री, आमदार नंतर... मराठी आधी!" प्रताप सरनाईक यांची ठाम भूमिका

मीरा-भाईंदर: मराठी एकीकरण समितीच्या वतीने मिरा रोड येथे आज मराठी अस्मिता, स्थानिक भाषिकांचे अधिकार आणि न्याय

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि ठाकरेंचे राजकारण!

मुंबई : तब्बल २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. त्यांच्या 'आवाज मराठीचा' मेळाव्याने

Mangalprabhat Lodha : आदित्य ठाकरेंकडून रोहिंग्या-बांग्लादेशींच्या झोपड्यांना वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न का? मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा रोखठोक सवाल

कुर्ला आयटीआय परिसरात पारंपरिक खेळाचे मैदान उभे राहणार : मंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई : कुर्ल्यातील महाराणा

Devendra Fadanvis : सरन्यायाधीश भूषण गवईंचा हा सत्कार फक्त विधीमंडळाकडून नव्हे तर १३ कोटी जनतेकडून – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : आज महाराष्ट्र विधीमंडळात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी

महिला मतदारांनी लेखी निवेदन दिल्यास 'दारूबंदी'

खारघर परिसरातील दारूबंदीचे निवेदन प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करणार - उपमुख्यमंत्री

मनसेच्या मोर्चात मंत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न, मराठी मोर्चात नेमकं काय घडलं?

मुंबई: मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यावसायिकांनी मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर