
ऑफ-ड्युटी अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले
मिळालेल्या माहितीनुसार, कात्रजच्या खोपडे नगर भागात तिसऱ्या मजल्याच्या खिडकीतून लटकलेल्या अवस्थेत आढळलेल्या चार वर्षांच्या मुलीला वाचवल्याने एक मोठी दुर्घटना टळली. कोथरूड अग्निशमन केंद्रात कार्यरत असलेले योगेश चव्हाण यांनी आपात्कालीन स्थितीत मुलीला सुखरूप बाहेर काढले. कामाला सुट्टी असल्यामुळे चव्हाण घरी होते, त्यांना बाहेर गोंधळ ऐकू आला. चव्हाण चौकशी करण्यासाठी त्यांच्या गॅलरीत गेले तेव्हा त्यांना तिसऱ्या मजल्यावरील एका बंद अपार्टमेंटच्या बेडरूमच्या खिडकीतून एक मूल धोकादायकपणे लटकत असल्याचे दिसले. परिस्थितीची निकड ओळखून, चव्हाण इमारतीकडे धावले. मजल्यावर पोहोचल्यावर त्यांना आढळले की दरवाजा बंद होता आणि मुलगी आत एकटीच होती. तिची आई तिच्या दुसऱ्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी थोड्या वेळासाठी बाहेर पडली होती.
View this post on Instagram
मदतीची वाट न पाहता, त्या चिमुरडीच्या आईला पाहताच चव्हाण यांनी आत प्रवेश केला आणि तातडीने अपार्टमेंटमध्ये प्रवेश करून मुलीला घसरण्यापूर्वीच सुरक्षित आत ओढले. मुलीला वाचवतानाचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून, हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ आणि ही घटना लहान मुलांना घरात एकटं सोडून जाणाऱ्या पालकांच्या डोळ्यात अंजन टाकणारा आहे.