वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात होणार भूमिगत पादचारी मार्ग

मुंबई : बुलेट ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मेट्रो ३ भुयारी मार्गिकेपर्यंत पोहोचता यावे यासाठी वांद्रे-कुर्ला संकुल येथे भूमिगत पादचारी मार्ग उभारण्यात येणार आहे. यामुळे सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जमिनीखालीच स्थानक बदलता येणार आहे.


आरे ते कफ परेड या ३३.५ किमीच्या मेट्रो ३ भुयारी मार्गिकेचे बीकेसी येथील स्थानक बुलेट ट्रेनच्या बीकेसी स्थानकापासून काही अंतरावर आहे. मेट्रो स्थानक प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयाजवळ आहे. बुलेट ट्रेन स्थानकातून बाहेर पडून रस्त्यावर येऊन मेट्रोपर्यंत प्रवास करण्यापेक्षा रस्तेमार्गे प्रवास करणे प्रवासी पसंत करतील. त्यापेक्षा या प्रवाशांना भुयारी मेट्रोकडे वळवणे आवश्यक आहे.


भूमिगत पादचारी मार्गामुळे बुलेट ट्रेनमधून आलेल्या प्रवाशांना बोगद्यातून बाहेर न पडता मेट्रो स्थानकात जाता येईल. परिणामी, मेट्रोची प्रवासी संख्या वाढवण्यास मदत होईल. भूमिगत पादचारी मार्गिकेचा काही भाग हा वाकोला नाल्याच्या खालून जाणार आहे. जमिनीखाली १२ मीटरवर ही मार्गिका तयार केली जाईल. साधारण १.३ किमी लांबीचा हा बोगदा असेल. भूमिगत पादचारी मार्गिकेचे नियोजन करण्यासाठी १ जुलैला बैठक पार पडली.


यानुसार बुलेट ट्रेन आणि मेट्रो ३ ही दोन स्थानके जोडली जातील. तसेच बुलेट ट्रेनचे स्थानक मेट्रो २ ब मार्गिकेच्या बीकेसी डायमंड मार्केट स्थानकालाही जोडले जाईल. त्यामुळे मेट्रो ३ स्थानकातून बुलेट ट्रेन स्थानकात व तेथून पुढे मेट्रो २ ब स्थानकात पोहोचणे शक्य होईल.

Comments
Add Comment

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या