या पोस्टरमध्ये आपल्याला रिषभच्या मागे अग्निकांकण दिसत आहे. यामधून तो योध्याच्या स्वरूपात आपल्याला एक हातात ढाल तर दुसऱ्या हातात कुऱ्हाड घेऊन अतिशय आक्रमक पद्धतीने झेप घेताना दिसत आहे. या ढालीवर अनेक बाण रुतताना दिसत आहेत तर मागून अग्निज्वालादेखील येताना दिसत आहेत. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग आणि सूड घेण्याची भावना दिसून येत आहे. त्याचा आक्रमक चेहरा एक प्रभावी योध्याचे गुण दर्शवत आहे.
रिषभ शेट्टी याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत निर्मात्यांनी हे पोस्टर प्रेक्षकांसमोर आणल आहे. याला कॅप्शन देताना इथे आख्यायिका जन्म घेतात आणि गर्जना होते असं म्हटलं आहे. कांतारा १ मध्ये रिषभ शेट्टी आपल्याला पाठमोरा दिसला होता तेव्हादेखील तो योध्याच्या भूमिकेत होता मात्र तेव्हा त्याच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कुऱ्हाड होती. रिषभ शेट्टी याला कांतारा १ मध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. जिथून पहिला भाग संपला त्यानंतर लगेच दुसऱ्या भागाचं कथानक सुरु होणार आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.