Stock Market marathi news: सुरुवातीच्या कलात बाजारात मंदीच सेन्सेक्स व निफ्टी घसरला 'असे' राहू शकते बाजार

  39

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात किरकोळ घसरण झाली आहे. सकाळी बाजार उघडण्यापूर्वीच अस्थिरतेचे संकेत बाजाराला मिळाले होते. सकाळी गिफ्ट निफ्टी थंड पडल्यावरच बाजारात मोठी अस्थिरता कायम राहण्याचे संकेत मिळत होतेच याशिवाय आशियाई बाजाराप्रमाणे बाजारात घसरण होईल का हे शेवटच्या सत्रातच कळेल. आज सेन्सेक्समध्ये सुरूवातीच्या कलात०.१० अंकांने व निफ्टीत २.५० अंकांने घसरण झाली आहे. सकाळी सेन्सेक्स बँक निर्देशांकात १२३.६७ अंकाने व बँक निफ्टीत ४४.८० अंकाने घसरण झाली. सत्र उघडताच सेन्सेक्स मिडकप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१० व ०.२४ अंकांने वाढ झाली. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.०४,०.५ अंकांने घसरण झाली आहे.

निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) यामध्ये आज संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. एफएमसीजी (१.२१%), तेल गॅस (०.२८%), कंज्युमर ड्युरेबल्स (०.२५%), पीएसयु बँक (०.२१%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.१९%) या समभागात सर्वाधिक वाढ झाली आहे. तर सर्वाधिक घसरण फार्मा (०.३५%), हेल्थकेअर (०.२७%), मिडस्मॉल आयटी सर्विसेस (०.५९%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.३२%), मिडिया (१.२०%) या समभागात सर्वाधिक घसरण झाली आहे.

अजूनही अमेरिका भारत व्यापार टेरिफ धोरणाबाबत स्पष्टता आली नसल्याने बाजारातील विशेषतः भारतासह आशियाई बाजारातील अस्थिरता कायम आहे. शुक्रवारी घरगुती गुंतवणूकदारांनी मोठ्या रोखीने विक्री केली होती तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी रोख खरेदी वाढवली होती. याशिवाय ओपेकने पुढील महिन्यात मुबलक तेल उत्पादनाचे आश्वासन दिल्यामुळे तेलाचे भाव आजही नियंत्रित आहेत. सोन्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्देशांक गोल्ड फ्युचरमध्ये देखील १.२१% घसरण झाली होती. डॉलरमध्ये सातत्याने घसरत असल्याने अस्थिरता असूनही बाजारात सपोर्ट लेवल राखण्यास मदत झाली आहे. मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अखेरच्या सत्रापर्यंत तेजी कायम राहिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. सेबीचे मुख्य तुहीन कांता पांडे यांच्या वक्तव्यानंतर आज गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल का हा खरा प्रश्न आहे. परवा टेरिफची अंतिम मुदत आहे. यावर ट्रम्प काय निर्णय घेतात यावर बाजाराचे लक्ष अवलंबून असेल.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ जेपी पॉवर (९.२३%), गोदरेज कंज्युमर (५.०%), एससीआय (४.०६%), डाबर इंडिया (३.७४%),एससीएमई (३.६५%), ज्योती लॅब्स (३.३८%), नुवामा वेल्थ (३.२८%), मेट्रोपोलिस हेल्थ (२.८४%), जेएसबब्लू एनर्जी (१.८५%), गोदरेज कंज्युमर प्रोडक्ट (४.३१%), हिंदुस्थान युनिलिव्हर (२.२१%), सिमेन्स एनर्जी (१.५१%), एशियन पेंटस (१.९१%), जियो फायनांशियल (०.५४%), बँक ऑफ बडोदा (१.५३%) समभागात झाली आहे.

सर्वाधिक घसरण दिपक फरर्टिलायझर (५.१५%), इंडस (३.३७%), गार्डन रिच (२.४४%), सीपीसीएल (२.४७%), भारती हेक्साकॉम (२३१%), होम फर्स्ट फायनान्स (२.१५%), भारत इलेक्ट्रॉनिक्स (२%), झी एंटरटेनमेंट (१.७८%), विशाल मेगामार्ट (१.७८%), झेन टेक्नॉलॉजी (१.६४%), भारत डायनॅमिक्स (१.५२%), इन्फो ऐज (३.८८%), अंबुजा सिमेंट (१.६५%), इटर्नल (१.०१%), टेक महिंद्रा (१.०३%), मारूती सुझुकी (१.०१%), अदानी एंटरप्राईजेस (०
४८%), टोरंट फार्मास्युटिकल (०.३६%) समभागात झाली आहे.

आजच्या बाजारातील सुरुवातीच्या कलांवर प्रतिक्रिया देताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले की,अमेरिका-भारत व्यापार करार आणि जेन स्ट्रीटवरील सेबीच्या अहवालाचे पडसाद आज बाजारातील हालचालींवर परिणाम करतील. ९ जुलैच्या टॅरिफ डेडलाइनपूर्वी अमेरिका आणि भारत यांच्यात अंतरिम व्यापार करार होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर ते सकारात्मक ठरेल. जेन स्ट्रीटवरील नियामक कारवाई आणि त्याचे परिणाम बाजाराचे बारकाईने लक्ष ठेवतील. डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगच्या प्रमाणावर परिणाम होण्याची शक्यता आहे ज्यामुळे स्टॉक एक्सचेंज आणि काही ब्रोकरेजवर परिणाम होईल. याचा परिणाम त्यांच्या शेअरच्या किमतींवरही होईल. अल्पकालीन समस्यांचा बाजारावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदार उच्च दर्जाचे स्टॉक खरेदी करण्यासाठी अल्पकालीन घसरणीचा वापर करू शकतात, शक्यतो बऱ्यापैकी मूल्यवान लार्जकॅपमध्ये.

पहिल्या तिमाहीच्या निकालांच्या अपेक्षा माफक आहेत. म्हणून चांगल्या कामगिरी करणाऱ्यांकडे लक्ष ठेवा.'

आजच्या सुरूवातीच्या निफ्टीवरील कलावर भाष्य करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले की,'२५३०० च्या आसपासच्या भागात गेल्या आठवड्यातील घसरणीला आधार मिळाला, जिथे अनेक पिव्होट जुळतात, ज्यामध्ये २०-३० जूनच्या वाढीचा ३८% फायबो देखील समाविष्ट आहे. शुक्रवारी उशिरा झालेल्या चढउतारांमुळे निफ्टी २५३८२ च्या पुढे ढकलण्यात यशस्वी झाला, १० दिवसांचा एसएमए देखील एक सकारात्मक परिणाम आहे, ज्यामुळे २६२००-२६५०० चा मार्ग पुन्हा चित्रात आला. तथापि, गती अजूनही मंद आहे आणि ऑसिलेटरचे सिग्नल देखील उभ्या वाढीची तरतूद करत नाहीत. यामुळे आम्हाला असे वाटते की, २५५००-५८८-६५०-७३० पॉइंट्सवर चढउताराच्या प्रयत्नांना आव्हानांचा सामना करावा लागेल आणि त्यानंतर आठवडा पुढे सरकत असताना कमी वळण येईल. सध्याच्या घसरणीचे प्रमाण २५३००-२४९२० पर्यंत मर्यादित राहण्याची अपेक्षा आहे.' एकूणच बाजारातील परिस्थिती पाहता बाजारात गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.
Comments
Add Comment

भूकंपानंतर आता रशियात ज्वालामुखीचा उद्रेक! राखेचे लोट ६,००० मीटर उंचीपर्यंत

मॉस्को: रशियाच्या कामचटका प्रांतातील Petropavlovsk येथे ८.८ तिव्रतेचा भीषण भूकंप झाल्यानंतर आता याच ठिकाणी ज्वालामुखीचा

शिंदेंनी शिवसेना का सोडली ? मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

मुंबई : विधान परिषदेच्या २०२२ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेत दोन गट झाले. हे असे का झाले एकनाथ शिंदे पक्ष नेत्यांशी न

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

'हिंदूंना बदनाम करण्याचा काही राजकारण्यांचा कट'

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांच्या निवडक नेत्यांनी हिंदूंना बदनाम

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची