पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट ! पालघर जिल्ह्यात आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट


मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील काही भागांत पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने पुणे घाटमाथा परिसरात अतिवृष्टीसदृश्य पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर ठाणे, नाशिक, पालघर, कोल्हापूर, सातारा आणि कोकणातील जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टी आणि घाट परिसरात पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे घाटमाथालगत भागात काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातील इतर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.


ठाणे, नाशिक, कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा
नाशिक घाटमाथा भाग, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यानध्ये पुढील २४ तासांत अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. या काळात कोकणात ४५-५५ किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील.



पालघर जिल्ह्यात आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी


जिल्ह्यात ७ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी या संबंधित आदेश जारी केले आहेत. असे असले तरी मुख्याद्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मात्र कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाचे काम करावे लागणार आहे. पालघर जिल्ह्यात सोमवारी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. सोमवारीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या रेड अलर्ट इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी ७ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना