OnePlusचा Nord 5 आणि Nord CE 5 उद्या भारतात होणार लाँच, पाहा किती असेल किंमत

मुंबई : टेक कंपनी वनप्लस ८ जुलैला OnePlus Nord 5 आणि Nord CE 5 हे दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि अधिकृत वेबसाइटवर लाँचची तारीख आधीच जाहीर केली आहे. चाहत्यांमध्ये सध्या वनप्लसच्या आगामी नॉर्ड 5 स्मार्टफोनबाबत मोठी चर्चा सुरू आहे. कारण या फोनमध्ये कंपनी 7,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी देणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही बॅटरी जर प्रत्यक्षात आली, तर ती या किमतीच्या श्रेणीत दुर्मिळ ठरेल आणि वापरकर्त्यांना दिवसभर उत्तम बॅकअप मिळेल आणि विशेष म्हणजे, 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे इतकी मोठी बॅटरी देखील कमी वेळात चार्ज होऊ शकते.


या स्मार्टफोन मधील प्रोसेसरबाबत बोलायचे झाल्यास, वनप्लस नॉर्ड 5 मध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 चिपसेट दिला जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ही चिप अतिशय शक्तिशाली असून याआधीच्या नॉर्ड 4 मधील स्नॅपड्रॅगन 7+ Gen 3 च्या तुलनेत मोठी अपग्रेड मानली जात आहे. सुरुवातीला मीडियाटेक डायमेन्सिटी 9400e वापरण्याची चर्चा होती, मात्र आता स्नॅपड्रॅगनवर शिक्कामोर्तब झाले आहे.


डिस्प्लेबाबतही लीक अपडेट्समध्ये उत्सुकता वाढवणारी माहिती आहे. फोनमध्ये 1.5K रिझोल्यूशनसह 120Hz रिफ्रेश रेट असलेली फ्लॅट OLED स्क्रीन दिली जाऊ शकते. ही स्क्रीन 6.74 इंच किंवा त्याहून थोडी मोठी असण्याची शक्यता आहे. डिझाईनच्या बाबतीत कंपनी ड्युअल-टोन फिनिशला अलविदा करून, अधिक साधे आणि क्लीन लुक देण्याच्या तयारीत आहे. फोन ऑफ-व्हाईट आणि पेल ब्लू रंगांमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.


कॅमेऱ्यांमध्ये फारसा बदल अपेक्षित नाही. मागील मॉडेलप्रमाणेच 50MP मुख्य कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स दिली जाऊ शकते. सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा असू शकतो. हार्डवेअरमध्ये फारसा बदल न करता, सॉफ्टवेअरच्या मदतीने फोटोंची क्वालिटी सुधारण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल.


वनप्लस नॉर्ड 5 मध्ये यावेळी मेटल फ्रेमऐवजी प्लास्टिक फ्रेम आणि ग्लास बॅक दिला जाऊ शकतो. यामुळे फोन हलका आणि किंमतही तुलनेने कमी राहू शकते, परंतु प्रीमियम फील थोडा कमी वाटू शकतो.



Nord CE 5 : किफायतशीर किंमतीत दमदार फीचर्स


यासोबतच,वनप्लस नॉर्ड सीई 5 देखील लाँच होण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये 6.7 इंच OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, मीडियाटेक डायमेन्सिटी 8350 प्रोसेसर, 8GB RAM आणि 256GB स्टोरेज दिले जाऊ शकते. खास म्हणजे यात 7,100mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगचा सपोर्टही असू शकतो. कॅमेरा विभागातही 50MP मुख्य सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड आणि 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात येऊ शकतो.



भारतात अपेक्षित किंमत


किंमत ही ग्राहकांसाठी मोठा मुद्दा ठरणार आहे. Nord 5 ची किंमत 30,000 रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे, तर Nord CE 5 ची किंमत सुमारे 25,000 रुपये असू शकते. यामुळे हे दोन्ही फोन त्यांच्या सेगमेंटमध्ये इतर ब्रँड्ससाठी जबरदस्त स्पर्धा उभे करू शकतात.


एकंदरीत, OnePlus Nord 5 आणि Nord CE 5 हे दोन्ही स्मार्टफोन दमदार बॅटरी, उत्तम प्रोसेसर आणि आकर्षक डिस्प्लेसह भारतीय बाजारात धमाका करणार असल्याची शक्यता आहे. लाँचची अधिकृत घोषणा लवकरच होऊ शकते.

Comments
Add Comment

Poison Capsule Case: विषारी कॅप्सूल वाटप प्रकरणात सायको किलरचा मास्टरप्लॅन; AI ला विचारले नको ते प्रश्न 

मुंबई: मुंबईतील (Mumbai) मोहरम मिरवणुकीदरम्यान विषारी कॅप्सूल वाटप (Poison Capsule Case) करण्याच्या संशयित कटाचा मुंबई

लोकल प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा निर्णय; स्थानकांवर बॅगांची होणार तपासणी

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल रेल्वेत प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांनी

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर