अमेरिकेतील टेक्सासमध्ये महापुर; ८१ जणांचा मृत्यू, ४१ जण बेपत्ता

  23

वॉशिंगटन : अमेरिकेतील टेक्सास राज्यात ग्वाडालूप नदीला आलेल्या अचानक पुरामुळे गेल्या तीन दिवसांत ८१ जणांचा मृत्यू झाला आहे. किमान ४१ जण अद्याप बेपत्ता आहेत. नदीजवळील एका मुलींच्या उन्हाळी शिबिरावर पूर आल्यामुळे मोठा धोका निर्माण झाला होता, मात्र तेथील सर्व ७५० मुलींना सुरक्षितपणे वाचवण्यात आले असून १२ जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी (दि.६) दिली.


सध्याच्या आकडेवारीनुसार, केर काउंटीमध्ये एकूण ६८ मृत्यू झाले आहेत, असे त्याचे शेरिफ लॅरी लेइथा यांनी रविवारी (दि.६) दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले, हे शनिवारी रात्रीच्या ४३ मृत्यूंच्या संख्येहून रविवारी मृत्यूच्या मोठी वाढ झाली आहे. मृतांमध्ये ४० प्रौढ आणि २८ मुलांचा समावेश आहे, यापैकी १८ प्रौढ आणि १० मुलांची ओळख अद्याप पटलेली नाही. कॅम्प मिस्टिकमधील किमान १० शिबिरार्थी आणि एका मार्गदर्शक महिलेचा अद्यापही काही थांगपत्ता लागलेला नाही, असे लेइथा यांनी सांगितले. शनिवारी (दि.५) अधिकाऱ्यांनी बेपत्ता असणाऱ्यांची संख्या २७ असू शकते, असा अंदाज वर्तवला होता, परंतु ही अधिकृत आकडेवारी प्रथमच रविवारी समोर आली. पूर आल्यावेळी कॅम्प मिस्टिकमध्ये सुमारे ७५० मुले उपस्थित होती, अशी माहिती शेरिफने यापूर्वी दिली होती.


टेक्सासच्या अनेक भागांमध्ये अजूनही अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याने पूराचा इशारा दिला असून नदीच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.अधिकार्‍यांनी सांगितले की, शुक्रवारी सॅन अँटोनियोमध्ये सुमारे १५ इंच (३८ सेंटीमीटर) पाऊस पडला. अवघ्या ४५ मिनिटांत नदीचे पाणी २६ फूट (८ मीटर) वाढले आणि त्यामुळे घरे व वाहने वाहून गेली.बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी बचाव पथके हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने शोधमोहीम राबवत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींविषयी, विशेषतः मुलांबद्दल, शनिवारी दुःख व्यक्त केले आणि प्रभावित कुटुंबीयांना संवेदना व्यक्त केल्या.


शुक्रवार (दि.४) पासून बचाव पथके सतत कार्यरत असून, बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यास आणि पूरग्रस्तांना मदत करण्यास प्रयत्न करत आहेत. या बचाव मोहिमेत १४ हेलिकॉप्टर्स, १२ ड्रोन, ९ विशेष बचाव पथके आणि सुमारे ५०० जवान सहभागी असून, शोध आणि मदत कार्यासाठी जमीन स्तरावर सतत प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत बचाव पथकाने ४०० हून अधिक लोकांना पूराच्या पाण्यात वाहून जाण्यापासून वाचवले आहे. अनेक लोकांना छपरांवरून, वाहनांमधून आणि पाण्याने भरलेल्या घरांमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.


रविवारी सकाळी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेक्सासचे राज्यपाल ग्रेग अ‍ॅबट यांच्या विनंतीवरून केर काउंटीसाठी ‘मेजर डिजास्टर डिक्लेरेशन’ (मोठा आपत्ती जाहीरनामा) साइन केला. तसेचं यावेळी ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ते "कदाचित शुक्रवार" पर्यंत टेक्सासला भेट देतील. त्यांनी हेही नमूद केले की, त्यांना रविवारीच जाण्याची इच्छा होती, पण ते तिथे गेले असते तर बचावकार्यामध्ये अडथळा निर्माण झाला असता.


शनिवारी (दि.४) राज्यपाल अ‍ॅबट यांनी प्रथमच शिबिराला भेट दिली त्यानंतर अ‍ॅबट यांनी रविवारी(दि.६) दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले की, मृत्यू झालेल्या व्यक्तींव्यतिरिक्त अजूनही संपूर्ण राज्यभरात ४१ लोक बेपत्ता आहेत. हे आकडे प्रत्यक्षात बेपत्ता झालेल्या व्यक्तींची खरी संख्या कमी दाखवू शकतात, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. "विशेषतः केरव्हिल परिसरात, अनेक लोक नदीच्या काठावर छावण्या टाकून राहत होते, आर.व्ही. (मोबाईल घरं) मध्ये राहत होते. त्यामध्ये असे अनेक लोक आहेत, जे बेपत्ता आहेत पण आम्हाला अजून त्यांच्या अस्तित्वाचीही कल्पना नाही, त्यामुळे त्यांची माहिती अद्याप निश्चित झालेली नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.


अ‍ॅबट यांनी सांगितले की, ग्वाडालूप नदी प्रणालीच्या संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरूच राहील, जेणेकरून इतर बेपत्ता व्यक्तींचा शोध घेता येईल. तसेच, ज्या नागरिकांना त्यांचे मित्र किंवा नातेवाईक बेपत्ता असल्याची शंका आहे, त्यांनी तात्काळ स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Comments
Add Comment

'ब्रिक्स'च्या अमेरिकाविरोधी धोरणांसोबत जो देश जाईल, त्याच्यावर १० टक्के अतिरिक्त 'टॅरिफ' ; ट्रम्प यांची थेट धमकी

ब्राझीलिया : 'ब्रिक्स'च्या अमेरिकाविरोधी धोरणांशी जुळणाऱ्या कोणत्याही देशावर अतिरिक्त १०% कर आकारला जाईल, अशी

अमेरिका १०० देशांवर १ ऑगस्टपासून लादणार १० टक्के 'परस्पर शुल्क'

वॉशिंगटन : १ ऑगस्ट २०२५ पासून अमेरिका जवळपास १०० देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर १० टक्के 'परस्पर शुल्क' लावणार आहे.

Israel-Hamas: इस्रायली सैन्याचे गाझावर हवाई हल्ले! संघर्ष पुन्हा पेटला

हमासच्या नौदल कमांडरसह तीन सैनिक ठार इस्रायल सैन्याने (आयडीएफ)  पुन्हा गाझा येथे हवाई हल्ला करत हमासच्या नौदल

BRICS Summit 2025: ब्रिक्स शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी ब्राझीलला पोहोचले, गणेश वंदनाने झाले स्वागत

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासिओ लुला दा सिल्वा यांनी केले पंतप्रधानांचे स्वागत रिओ दि जानेरो: १७ वी

Texas Flood: टेक्सासमध्ये आलेल्या महापूरात ५१ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

वॉशिंगटन: अमेरिकेतील टेक्सास राज्यात शुक्रवारी (दि.४) झालेल्या जोरदार पावसामुळे आलेल्या पुरात ५१ लोकांचा

एलॉन मस्कची मोठी घोषणा, अमेरिकेत बनवणार तिसरा पक्ष, ट्रम्प यांना देणार टक्कर

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या २४९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना बहुचर्चित वन बिग