‘बाजारात हेराफेरी खपवून घेतली जाणार नाही’

तुहीन कांता पांडे यांचा गंभीर इशारा


मुंबई: 'बाजारात कुठल्याही प्रकारची हेराफेरी खपवून घेतली जाणार नाही' असे स्पष्ट संकेत सेबीचे अध्यक्ष तुहीन कांता पांडे यांनी दिले आहेत. बॉम्बे चार्टर्ड अकाउंटट सोसायटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.


जेन स्ट्रीट प्रकरणानंतर बाजारातील अस्थिरतेचे लोण पसरण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले. 'सेबी पारदर्शकतेला प्राधान्य देत असून कुठल्याही प्रकारचे घोटाळे खपवून घेणार नाही. बाजारातील या कृत्यांना थारा नाही. या उद्दिष्टावर कुठलीही तडजोड होणार नाही. कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये कुठलीही अनियमितता आम्ही आणून देणार नाही' असेही वक्तव्य त्यांनी कार्यक्रमात बोलताना दिले.


कथित प्रकरणात जेन स्ट्रीटने गुंतवणूकदारांची दिशाभूल करत ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ४३,००० कोटींहून अधिक गफला केल्याचे सेबीने स्पष्ट केले होते. त्यानंतर बाजारात मोठी खळबळ माजली. जानेवारी २०२३ ते मार्च २०२५ पर्यंत शेअर बाजारात हा गैरव्यवहार सुरू होता असे सेबीने आपल्या निवेदनात म्हटले होते.
ग्रुपला स्टॉक फ्युचर्स, इंडेक्स फ्युचर्स आणि कॅश सेगमेंटमध्ये एकत्रित तोटा ७,६८७ कोटी होता.


जेन स्ट्रीटने बाजारात शेअरचा किमती फूगवून कृत्रिम किमती तयार केल्या. यातून डेरिएटिव्हमध्ये कमावण्यासाठी गुंतवणूकदारांचा बुद्धीभेद करत ४३००० कोटींच्या नफ्याची कमाई केली. यानंतर हे शेअर्स बाजारात लक्षणीयरीत्या कोसळले आहेत.


सेबी या नियामक मंडळाने याविषयी अधिक माहितीची जमवाजमव सुरू केली आहे. त्यामुळे याविषयी सेबीचा अधिक तपास सुरू झला आहे. सेबीने कंपनीकडून ४८४४ कोटींचा निधीही गोठवला होता.


बाजारातील समभाग टंचाईचा फुगवटा निर्माण करून नंतर समभागात आक्रमक विक्री करून लक्षणीय पद्धतीने समभागांच्या कि-मती स्वस्त करून आपला नफा जेन स्ट्रीटने कमावला. सेबीचे मुख्य तुहीन कांता पांडे यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमातही सेबी आर्थिक घोटाळ्यावर अत्यंत कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले होते.

Comments
Add Comment

Gold Silver Rate Today : जळगावच्या सुवर्ण बाजारात पुन्हा तेजी, सोनं-चांदी महागल्याने ग्राहकांना धक्का

Gold Silver Rate Today : जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग दोन दिवस सोने, चांदीच्या दरात घसरण नोंदविण्यात आल्याने

Piyush Goyal : नऊ मुक्त व्यापार करारांमुळे भारतीय उद्योग, व्यवसायांना मिळाली चालना

नवी दिल्ली : भारतीय उद्योगपतींनी आणि नागरिकांनी भारतीय उत्पादने आणि सेवा जागतिक बाजारपेठेत नेताना उचित व्यापार

Plastic Currency : चलनात येणार १० आणि २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने १० रुपये आणि २० रुपये मूल्याच्या प्रत्येकी एक अब्ज प्लास्टिक बँक नोटांना फील्ड

सोनं पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव काय आहे?

सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झालेली दिसून आली आहे. मंगळवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात तेजी पाहायला

Gold Rates Update : ऐन सणासुदीत सोनं महागलं! सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या १२ ऑगस्टचे ताजे दर

मुंबई: सोने खरेदी करणाऱ्या ग्राहका

SBI Locker News : SBI लॉकरमधून ५० लाखांचे दागिने गायब; पूर्ण रक्कम परत मिळणार का? RBIचा हा नियम नक्की जाणून घ्या!

कानपूर : बँकेच्या लॉकरमध्ये दागिने आणि मौल्यवान वस्तू ठेवल्या की त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत, असा अनेकांचा समज