Fedex Digital: डिलिव्हरी बॉक्सवरील लेबलद्वारे होतेय ग्राहकांची फसवणूक: फेडएक्स

सायबर गुन्हेगारांचे नवीन टार्गेट: डिलिव्हरी बॉक्स घोटाळा 


मुंबई: सगळ्याच सायबर घोटाळ्यांमध्ये हॅकिंग सामील नसते. काही घोटाळे आपल्या दैनंदिन सवयींमुळे होतात. शिपिंग लेबल न काढता एखादा डिलिव्हरी बॉक्स फेकून देण्यात काय नुकसान असणार आहे,असे आपल्याला वाटू शकते, पण तसे केल्याने तुमचे नाव, फोन नंबर आणि पत्ता यांसारखे वैयक्तिक तपशील उघड होत असल्याचे जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपनी फेडएक्सने ग्राहकांच्या निदर्शनास आणले आहे. घोटाळेबाज या तपशीलांचा उपयोग करून स्वतः वैध असल्याची बतावणी करून तुमच्याकडून आणखी संवेदनशील डेटा काढून घेऊ शकतात. अशा धोक्यांपासून सावध राहणे ही सुरक्षित राहण्याची पहिली पायरी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.


डिलिव्हरी बॉक्स घोटाळा म्हणजे काय?


प्रत्येक डिलिव्हरी बॉक्सवर काही महत्त्वाची वैयक्तिक माहिती असते जशी की, तुमचे नाव, पत्ता आणि फोन नंबर. सायबर गुन्हेगार बऱ्याचदा असे फेकून दिलेले बॉक्स कचऱ्याच्या डब्यातून गोळा करतात आणि त्याच्यावर असलेल्या माहिती चा उपयोग कुरियर एजंट किंवा ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणून बतावणी करण्यासाठी करतात. त्यांच्याकडे पुरेसा डेटा गोळा झाल्यानंतर त्यांचे संभाषण खरे वाटते आणि मग घोटाळा होतो.


ते तुम्हाला कसे फसवतात?


तुमची माहिती मिळवल्यावर, घोटाळेबाज:


तुम्हाला दूषित लिंक किंवा क्यूआर (QR) कोडसह खोटा डिलिव्हरी किंवा रिफंड मेसेज पाठवू शकतात


कुरियर एजंट म्हणून तुम्हाला कॉल करू शकतात आणि तुमच्याकडून ओटीपी किंवा काही वैयक्तिक माहिती मागू शकतात


तुम्हाला बनावट पडताळणी पत्रके भरण्यास सांगू शकतात.


संशयास्पद लिंकवर क्लिक केल्यामुळे किंवा अज्ञात क्यूआर कोड स्कॅन केल्यामुळे मालवेअर हल्ले किंवा आर्थिक घोटाळा होऊ शकतो. एका साध्या बॉक्स लेबलपासून सुरू झालेला हा प्रकार मोठ्या ओळख-चोरीच्या मामल्यापर्यंत पोहोचू शकतो.


सुरक्षित राहण्याचा सोपा उपाय: थांबा, विचार करा आणि कृती करा


बॉक्स फेकण्यापूर्वी त्यावरील शिपिंग लेबल काढून टाका किंवा स्क्रॅच करा


तुमचे नाव, फोन नंबर आणि पत्ता यावर एखाद्या मार्करने काळे करा


लेबल्स फेकून देण्याअगोदर लेबल्स फाडून त्याचे छोटे छोटे तुकडे करा


अवांछित संभाषणापासून (कम्युनिकेशन) नेहमी सावध रहा


अधिकृत ग्राहक सेवा चॅनलच्या मदतीने संशयास्पद मेसेज किंवा कॉल तपासून बघा


स्रोताची तपासणी / खात्री केल्याशिवाय कधीही पैसे ट्रान्सफर करू नका किंवा ओटीपी सहित कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका.


या डिजिटल युगात, भौतिक कचरा देखील सायबर गुन्ह्यासाठी मदतरूप ठरू शकतो. सावध राहून आणि वैयक्तिक डेटा आपण कसे हातळतो याबाबतीत छोटे छोटे सजग बदल करून तुम्ही स्वतःचे आणि तुमच्या प्रियजनांचे रक्षण करू शकता. जर तुम्ही एखाद्या गुन्ह्याला बळी पडला असाल किंवा सायबर घोटाळ्याची शंका तुम्हाला असेल, तर आपल्या स्थानिक कायदा अंमलबजावणीशी संपर्क साधा किंवा १९३० वर सायबर क्राइम हेल्पलाइन मार्फत किंवा सायबरक्राईम. जीओव्ही.इनवर तत्काळ त्याची तक्रार करा. सायबर जागरूकता आणि शिक्षणाच्या मदतीने अधिक सुरक्षित, लवचिक समुदायाची उभारणी करण्याबाबत फेडएक्स वचनबद्ध आहे, ज्यातून एक जागतिक लॉजिस्टिक्स अग्रणी या नात्याने आमच्या ग्राहकांचे, टीम सदस्यांचे आणि समुदायांचे रक्षण करण्याबाबतची आमची जबाबदारी प्रतिबिंबित होते.

Comments
Add Comment

CJP : सीजेपी आंदोलनकाळात महाराष्ट्रात दाखल गुन्हे रद्द होणार

मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट'मधील अनियमिततेविरोधात आणि कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) समर्थनार्थ

World Chess Championship : गुकेश आणि सिंदारोव्ह यांच्यातील जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढत जिनिव्हामध्ये रंगणार

नवी दिल्ली : विद्यमान जागतिक विजेता गुकेश डी आणि आव्हानवीर जावोखिर सिंदारोव्ह यांच्यातील २०२६ ची जागतिक

Dr Shrikant Shinde : ‘जीमॅट’, ‘जीआरई’प्रमाणे भारतात परीक्षा पद्धती लागू करा - डॉ. श्रीकांत शिंदे

नवी दिल्ली : अमेरिकेत जीमॅट, ‘जीआरई’च्या परीक्षा वर्षातून अनेकदा घेतल्या जातात आणि त्यांचा निकाल लगेच घोषीत

Anti Paper Leak Bill : ‘अँटी पेपर लीक’ विधेयकावर लोकसभेत खडाजंगी

नवी दिल्ली : लोकसभेत अँटी पेपर लीक विधेयकावर झालेल्या चर्चेदरम्यान सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार

Mangal Milan NDA Meeting : एनडीए संसदीय पक्षाची 'मंगल मिलन' बैठक

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एनडीए संसदीय पक्षाची 'मंगल मिलन' बैठक नुकतीच पार पडली.  या

Union Minister Jitendra Singh : परीक्षा सुधारणा विधेयक भारतीय संसदेच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरेल - केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

नवी दिल्ली : लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांच्या प्रतिबंधासाठी) सुधारणा विधेयक, २०२६ वर चर्चा सुरू झाली