Wednesday, July 9, 2025

मनसे पदाधिकाऱ्याचा मुंबईत दारू पिऊन अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा, मराठी इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ

मनसे पदाधिकाऱ्याचा मुंबईत दारू पिऊन अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा, मराठी इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ
मुंबई : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत दिसत असलेली घटना रविवारी रात्री अंधेरीत घडली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख दारू पिऊन गाडी चालवत होता. त्याने दारूच्या नशेत गाडी चालवल्यामुळे रविवारी रात्री राजश्रीच्या गाडीला अपघात झाला. हा आरोप राजश्री मोरेने केला आहे. राजश्रीने अपघातानंतर काढलेला व्हिडीओ इन्स्टावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत राहिल शेख अर्धनग्न अवस्थेत दिसत आहे. तो वारंवार आक्रमक होत आहे. राजश्रीच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. राजश्रीला शिव्या देतानाही व्हिडीओत दिसत आहे. “xxx पैसे घे. जा आणि पोलिसांना सांग.. मी जावेद शेखचा मुलगा आहे. मग काय होईल ते तुला दिसेल”, अशी धमकी राहिलने दिल्याचे राजश्रीने सांगितले.

व्हिडीओमध्ये राहील अपघातस्थळी आलेल्या पोलिसांशीही वाद घालताना दिसत आहे. पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्या अंगावर धावून जाणे, शिव्या देणे असा प्रकार करतानाही राहील दिसत आहे.




राजश्री मोरेने राहिल शेख विरोधात एफआयआर नोंदवली आहे. ही एफआयआर पण राजश्रीने व्हिडीओत दाखवली आहे. राहिल दारुच्या नशेत गाडी चालवर होता आणि वडिलांच्या राजकीय पदाचा गैरफायदा घेत धमक्या देत होता; असा आरोप राजश्री मोरेने केला आहे. एफआयआर नोंदवली म्हणून मनसेच्या काही कार्यकर्त्यांनीही धमक्या दिल्याचे राजश्री मोरेने सांगितले.

अलिकडेच मनसेच्या आक्रमक भूमिकेला राजश्रीने विरोध केला होता. इतरांवर भाषा लादण्यापेक्षा स्थानिकांनी अधिक मेहनत करावी, असं राजश्रीने जाहीररित्या सांगितलं होतं. स्थलांतरितांशिवाय मुंबईतील स्थानिक मराठी लोकांची स्थिती आणखी बिकट होईल, असा दावाही तिने केला. तिच्या या वादग्रस्त विधानानंतर, वर्सोवा इथल्या मनसे कार्यकर्त्यांनी तिच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर राजश्रीने जाहीर माफी मागितली आणि तिच्या सोशल मीडिया हँडलवरून तो व्हिडीओ काढून टाकला होता.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा