मनसेच्या रोहन पवार नावाच्या कार्यकर्त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केली होती. या पोस्टमधील भाषेविषयी आक्षेप घेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी रोहन पवार विरोधात गुन्हा नोंदवला. लवकरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले. यानंतरही कल्याणमध्ये तणाव कायम आहे.