राजकारणाची क्रिकेटवर मात

भारत - बांगलादेश क्रिकेट मालिका पुढे ढकलली


मुंबई : भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार होता. तिथे भारत आणि बांगलादेश यांच्यात ऑगस्ट २०२५ मध्ये तीन एकदिवसीय सामने आणि दोन टी २० सामने होणार होते. पण हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड नव्याने चर्चा करणार आहे. स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक निश्चित झाल्यावर जाहीर केले जाईल. क्रिकेटचा सध्याचा कार्यक्रम बघता सप्टेंबर २०२६ पर्यंत भारत - बांगलादेश दरम्यान मालिका होण्याची शक्यता कमी आहे.


बांगलादेशमध्ये सध्या निवडून आलेले सरकार नाही. अंतरिम प्रमुख मुहम्मद युनूस देश सांभाळत आहेत. त्यांनी पुढील वर्षीपर्यंत निवडणुका होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. बांगलादेशमध्ये हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांवरील हल्ले आणि अत्याचार यात वाढ होत आहे. यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत बीसीसीआयने दौरा पुढे ढकलला आहे.


Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात