पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट!

  59

सात तालुक्यांत मुसळधार पाऊस


पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये वसई वगळता इतर सात तालुक्यांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून पावसाने चांगलच जोर धरला आहे . मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रादेशिक हवामान विभागाने शनिवार व रविवारी पालघर जिल्ह्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. जिल्ह्यात सर्वत्र पावसाची बॅटिंग सुरू आहे.


आठवडा भराच्या विश्रांतीनंतर शुक्रवार रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. वसई तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. रविवारी जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांत जिल्ह्यात सर्वत्र जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी विशेषतः या दोन दिवसांमध्ये घराबाहेर न पडण्याचे आणि आवश्यक असल्यास बाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.


अनेक प्रमुख रस्त्यांवरून पाणी ओसंडून वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अर्ध्याहून अधिक नाले तुडुंब भरले असून, काही ठिकाणी नाले ओसंडून वाहत आहेत. विशेष म्हणजे, रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामांमुळे ठिकठिकाणी पडलेले खड्डे पावसाच्या पाण्याने भरले आहेत. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालक दोघांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.


एकीकडे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना, "विकेंड" असल्याने अनेक पर्यटकांनी धबधब्यांकडे आणि निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा बेत आखला आहे. मुसळधार पावसामुळे निसर्गाचे सौंदर्य अधिकच बहरले असल्याने पर्यटकांमध्ये मोठा उत्साह ठिकठिकाणी दिसून येत आहे. नदीकिनारी, धबधब्यांच्या जवळ आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तरीसुद्धा पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.

Comments
Add Comment

पालिका अधिकाऱ्याकडे ३१ कोटींची अपसंपदा

लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल विरार  : वसई-विरार महापालिकेचे निलंबित उपसंचालक नगररचना वाय.एस. रेड्डी

जिल्ह्याची कृषिप्रधान ओळख मिटण्याची चिन्हे

वसंत भोईर वाडा : शासनाच्या शेतीकडे पाहण्याच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील पारंपरिक शेतीव्यवसाय अडचणीत आला

अवैध बांधकामांना माजी आयुक्तच जबाबदार

‘ईडी’ कार्यालयाकडून भांडाफोड विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या घोटाळ्यामध्ये अनिलकुमार पवार

वसईत 'भूतांचा' अनोखा आंदोलन: स्मशानभूमी वाचवण्यासाठी प्रयत्न!

मुंबई : मुंबईपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वसईत, स्थानिकांनी एका अनोख्या आणि सर्जनशील पद्धतीने

घोडबंदर ते तलासरी महामार्ग धोकादायक स्थितीत

तातडीने लक्ष द्यावे अशी खासदारांची मागणी वाडा : पालघर लोकसभा मतदारसंघातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८

प्रियकरासोबत रंगेहाथ सापडल्याने पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक

घरातच गाडले, भावानेच घरातील फरशा बदलल्या नालासोपारा : नालासोपारा येथे प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले गेल्यानंतर