डोंबिवली : पेण-पनवेल-कल्याण रेल्वे दिवा मार्गे सुरू करण्याची नितांत गरज आहे. ही सेवा सुरू केल्यानंतर लाखो प्रवाशांचा वेळ वाचेल तसेच मेन लाईनवरील ताण कमी होण्यास मदत होईल.
कल्याण टिटवाळा अंबरनाथ येथूनच्या पट्ट्यांतून असंख्य प्रवाशी पनवेलच्या दिशेला जाणारे आहेत. त्यांना ठाणे मार्गे प्रवास करावा लागतो. सदर सेवा सुरू केली तर प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल. या मागणीला विविध प्रवाशी संघटनांनी संमती दिली असून ती पूर्ण व्हावी अशी प्रवाशी संघटने बरोबरच या पट्यांतील नागरिकांची देखील मागणी आहे.
कल्याण-डोंबवली बससेवा असली तरी ती अनियमित असते. कल्याण पनवेल प्रवास पाऊण तासाचा होईल सध्या या प्रवासाला तास-दीडतास वेळेपेक्षा जास्त वेळ व गाड्या बदलण्यासाठी त्रासही वाचेल.