Sunday, July 6, 2025

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत


नवी मुंबई: मुंबईतील मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर सामान्यतः दर रविवारी मेगाब्लॉक हा असतोच! त्यामुळे आजही या दोन्ही मार्गिकेवरील लोकल ट्रेन मेगाब्लॉकमुळे सकाळपासून उशिराने धावत आहेत. त्यात आज दिवसभर पाऊस पडत असल्याकरणामुळे काही रेल्वे मार्गावर पाणी भरल्याचे बोलले जात आहे. हे कमी होतं म्हणून, आता यात आणखी भर पडली आहे. ती म्हणजे हार्बर मार्गावरील वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाली आहे.  ताज्या वृत्तानुसार हार्बर रेल्वे मार्गावरील नेरूळ ते पनवेल सेवा बंद करण्यात आल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, साडे चार वाजल्यापासून नेरुळ स्टेशनजवळ रेल्वेची एक मशीन पडल्याने हार्बर आणि ट्रान्स मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र, हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी आणि पनवेल ते बेलापूर सेवा सुरू आहेत. तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी आणि ठाणे ते नेरळ सेवा सुरू आहेत.



रेल्वे ट्रॅकवरून प्रवाशांची पायपीट


नेरुळ ते पनवेल सेवा बंद झाल्याने काही प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवरून प्रवास सुरु केला आहे. तर काही प्रवासी घरी पोहोचण्यासाठी पर्यायी मार्गाकडे वळाले आहेत. तर अनेक प्रवासी रेल्वे स्टेशनवरच लोकल सुरु होण्याची वाट पाहत आहेत.दरम्यान, काही तासांपूर्वी नेरूळ रेल्वे स्टेशनजवळील उभ्या असलेल्या रेल्वेवर स्टंट करताना ओव्हरहेड वायरला हात लागल्यामुळे मुलगा गंभीर जखमी झाला. हा मुलगा कोपरखैरणे येथील रहिवासी असल्याचे समजते.

Comments
Add Comment