महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

पंढरपूर : शासकीय महापूजेच्या निमित्ताने पंढपूरमध्ये असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. राज्यातील शेती आधुनिक आणि अधिक उत्पादक व्हावी तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी महायुती सरकारने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी दरवर्षी पाच हजार कोटी या पद्धतीने पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

ठिबक संच, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे, सिंचनासाठी पंप अशा विविध योजना राबवून शेतीचे आधुनिकीकरण केले जाईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केला जाईल. ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे बोलताना दिली.

शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करता यावा, म्हणून राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना बाजारपेठांशी थेट जोडणाऱ्या योजनाही बाजार समित्यांच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. त्यामुळे शेतमालाला योग्य भाव मिळण्यास मदत होत आहे. गावातील विकास सहकारी संस्थांना बहुउद्देशीय संस्थांमध्ये रूपांतरित करण्याची योजना केंद्र सरकारने तयार केली आहे. या संस्थांना एकूण अठरा प्रकारच्या व्यवसायांची परवानगी दिली जाणार आहे. यामुळे या संस्था शेतकरी आणि बाजारपेठ यांच्यात महत्त्वाचा दुवा ठरणार आहेत. मालाची साठवण, कोल्ड स्टोअरेजची सुविधा, वितरण व्यवस्था मजबूत करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे; असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Comments
Add Comment

Gautami Patil : मोठी बातमी! पुण्यात गौतमी पाटीलच्या वाहनाचा मोठा अपघात, नेमकं घडलं तरी काय?

पुणे : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) तिच्या कार्यक्रमांना होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे

गौतमी पाटीलच्या गाडीला पुण्यात अपघात, रिक्षाचालकासह ३ जखमी

पुणे: प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कारला पुण्यात भीषण अपघात झाला. पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

पुणे-मुंबई एक्सप्रेसवरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ कधी सुरु होणार? एमएसआरडीसीने सांगितलं...

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

लता मंगेशकर यांच्या नावाने पुण्यात आशियातील सर्वात मोठ्या रुग्णालयाची उभारणी

‘मी लता दीनानाथ’ या कार्यक्रमात हृदयनाथ मंगेशकर यांची घोषणा पुणे : ‘पुढील वर्षी लता मंगेशकर यांच्या नावाने

ST Transport Fare Increase : एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! दिवाळीत प्रवास थेट १०% महागणार; चाकरमान्यांच्या खिशाला मोठा फटका, शिवनेरी ते...

मुंबई : सध्या राज्यात सणासुदीचा काळ सुरू आहे. विशेषतः दिवाळी तोंडावर आल्यामुळे मुंबई आणि पुणे यांसारख्या मोठ्या

Ashish Shelar : गांधी-शास्त्रींचे दुर्मिळ दस्तऐवज खुले! सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या हस्ते मुलुंडमधील प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाने आयोजित केलेल्या एका विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन आज