हे तांदूळ खा , फिटनेस जपा !

मुंबई : आपल्या देशात अनेक प्रकारचा तांदुळ पिकवतात . भारतीय आहारात भाताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र, आधुनिक काळात केवळ पांढऱ्या भातावर अवलंबून राहण्याऐवजी पोषणमूल्यांनी समृद्ध इतर प्रकारांचा विचार करणे आवश्यक आहे. आज आपण अशाच आरोग्यदायी व पारंपरिक भातप्रकारांची माहिती घेणार आहोत, जे तुमच्या आहाराला अधिक समृद्ध करू शकतात. हे भातप्रकार आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट केल्यास पचन सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि संपूर्ण पोषण मिळते.


पांढऱ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो . तो जवळपास ७० ते ९० च्या आसपास असतो. यात पोषक तत्वेही कमी असतात आणि कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. त्यामुळे पांढरा तांदुळ खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते. लठ्ठपणा वाढल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. जे आधीपासून मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांनी तर पांढरा तांदुळ खाऊच नये असा सल्ला दिला जातो.



जाणून घ्या कोणते आहेत हे तांदळाचे प्रकार : 


ब्राउन राईस
या तांदळात फायबरचे प्रमाण जास्त आहे . वजन कमी करणाऱ्यांसाठी आणि मधुमेहींसाठी विशेष फायदेशीर आहे .


सालाम राईस
दक्षिण भारतातील लांबट दाण्याचा भात. सौम्य चव आणि हलकं पचन यामुळे दररोजच्या आहारासाठी योग्य .


ब्लॅक राईस
काळसर रंगाचा हा भात अँटीऑक्सिडंट्सने भरलेला असतो. वजन कमी करणे, मधुमेह नियंत्रित करणे असे गुणधर्म यात आहेत .


रेड राईस
फायबरयुक्त, खनिजांमध्ये भरपूर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी उपयुक्त. केरळ, कर्नाटकात याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.


नवारा राईस
आयुर्वेदात याला औषधी मानले जाते. हा तांदूळ खाल्ल्याने पचन सुधारते , रोगप्रतिकारक शक्ती वाढते , विशेषतः रुग्ण व वृद्ध व्यक्तींना उपयुक्त.


काळा जीरा राईस
सुगंधी, लांबसर दाणे असलेला हा भात सौम्य चवीचा असतो. बासमतीसारखा दिसतो पण पचनास अधिक हलका आहे .


Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि