N C Classic: नीरज चोप्राने एनसी क्लासिक स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक, घरच्या मैदानावर दमदार कामगिरी

बेंगळुरू: शनिवारी बेंगळुरूमधील श्री कांतीरवा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यजमान म्हणून भाग घेणारा भारतीय खेळाडू नीरज चोप्राने पुन्हा एकदा शानदार कामगिरी करत, स्वतःला सिद्ध केले आहे. एनसी क्लासिकच्या पहिल्याच सत्रात नीरजने सुवर्णपदकावर आपला हक्क गाजवला. 


सुवर्णपदकावर गवसणी घालणारा नीरजचा सर्वोत्तम भालाफेक हा तिसऱ्या प्रयत्नात होता. आज बेंगळुरूच्या कांतीरवा स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेत नीरज चोप्राने इतर ११ खेळाडूंना पराभूत करून ही कामगिरी केली आहे.


सर्वोत्तम कामगिरी करताना नीरजने ८६.१८ मीटर अंतर गाठले. तर केनियाचा ज्युलियस येगो दुसऱ्या क्रमांकावर राहत रौप्यपदक मिळवले. येगोने ८४.५१ चा सर्वोत्तम फेक केला. त्याच वेळी, श्रीलंकेच्या रमेश पाथिरागे (८४.३४ मीटर) ने कांस्यपदक जिंकले. नीरज चोप्राची स्पर्धेत सुरुवात चांगली झाली नाही. त्याचा पहिला प्रयत्न फाऊल होता. त्यानंतर त्याने दुसऱ्या प्रयत्नात ८२.९९ मीटर अंतर गाठले. तिसऱ्या प्रयत्नाने तो अव्वल स्थानावर पोहोचला. तर त्याचा चौथा प्रयत्न फाऊल होता. नीरजचे शेवटचे दोन प्रयत्न अनुक्रमे ८४.०७ आणि ८५.७६ मीटर होते.


 

 
Comments
Add Comment

बुमराह परतणार पण अक्षर पटेल नाही खेळणार, टीम इंडिया चिंतेत

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही

धरमशाला टी ट्वेंटी सामन्यात भारताचा विजय, मालिकेत घेतली आघाडी

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

फुटबॉलच्या २०३४च्या विश्वचषकासाठी 'प्रोजेक्ट महादेवा' मधून गुणवान खेळाडू मिळतील : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवा'चा

भारत जिंकला, टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानने टेकले गुडघे!

दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेत भारतीय युवा संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपला दबदबा

दुबईत आज भारत-पाक हाय व्होल्टेज सामना

शतकवीर वैभव सूर्यवंशीवर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष दुबई : १९ वर्षांखालील आशिया चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेत भारतीय