Gold Silver Rate marathi : सोने पुन्हा एकदा महागले 'इतक्या' रूपयाने सोने महाग वाढीमागे 'हे' आंतरराष्ट्रीय कारण

  19

प्रतिनिधी: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सोन्याने जोर पकडला आहे. सलग दोन दिवस सोन्यात झालेली घसरण पुन्हा तेजीकडे परावर्तित झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीत सोने चांदीच्या किंमतीत मोठी चढउतार,अस्थिर ता (Volatility) अस्तिवात आहे. आज सकाळी 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोने किंमतीत १० रूपयांची वाढ झाल्याने किंमत प्रति ग्रॅम ९८८३ रुपयांवर गेली आहे. २२ कॅरेट प्रति ग्रॅमसाठी किंमतीत १० रूपये वाढ झाल्याने प्रति ग्रॅम किंमत ९०६० रुपयांवर गेली आहे. याखेरीज १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमतीत ८ रूपयांनी वाढ झाल्याने प्रति ग्रॅम किंमत ७४१३ रूपयांवर गेली आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार, भारतीय सराफा बाजारातील २४ कॅरेट प्रति तोळा किंमत १०० रूपयांनी वाढत ९८३३० रूपयांवर गेली आहे. २२ कॅरेट प्रति तोळा किंमत १०० रूपयांनी वाढत ९०६०० रूपयांवर गेली. १८ कॅरेट प्रतितोळा किं मत ८० रूपयांनी वाढत ७४१३० रूपयांवर गेली आहे. मुंबईसह ठाण्यात व पुण्यातील बाजारात २४ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ९८८३ रुपयावर व २२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ९०६० रूपये व १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ७४७५ रूपयांवर पोहोचली आ हे.


आज सकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Future Index) यामध्ये सकाळपर्यंत ०.११% वाढ झाली आहे. सोन्याच्या गोल्ड स्पॉट दरात ०.३२% वाढ झाल्याने किंमत पातळी ३३३८ डॉलर प्रति औंसवर गेली आहे. भार तीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) या सोन्याच्या निर्देशांकात कुठलीही वाढ अथवा घसरण सकाळपर्यंत झाली नाही, त्यामुळे सोन्याची दरपातळी ९६९८८ रुपयांवर कायम आहे.


का सोने वाढत आहे?


प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेचा परिणाम भारतीय बाजारात दिसत आहे. विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांनी ९ जुलै ही टेरिफ वाढीची (Tariff Hike) अंतिम मुदत जाहीर केल्यानंतर अनेक देशांशी अमेरिकेची बोलणी सुरू आहे. र शियाची उत्पादन खरेदी केल्यास ५००% टेरिफची धमकी युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यामुळे चीन व अमेरिका यांची अमेरिकेशी बोलणी फिसकटली आहे. अमेरिकेला भारतातील संवेदनशील क्षेत्रात गुंतवणूकीची परवानगी मागित ल्याने टेरिफचे घोडे अडले. यामुळे गुंतवणूकीतील तरलता घटल्याने सोन्याला मागणी वाढत आहे. युएस टेरिफ वाढीबरोबरच मुख्यतः गुंतवणूकदार युएस पेरोल (Non Agricultural Data) यांची वाट पाहत असल्याने सोन्याचा आधार मो ठ्या कालावधीसाठी घेतला जाऊ शकतो. डॉलर सातत्याने घसरत असला तरी गुंतवणूकीचा ओघ सध्या भारतात घटल्याने व पुरवठ्यातही मागणीपेक्षा घसरण झाल्याने ही वाढ होत आहे.


चांदीच्या दर जैसे थे!


सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही किरकोळ वाढ सलग दोन दिवस झाली होती. मात्र चांदीनेही पुन्हा युटर्न मारत आपली दरपातळी कायम राखली आहे. चांदीच्या दरातील वाढ ही प्रामुख्याने सोन्याला पर्याय म्हणून गेल्या महिन्यात झाली होती. ज्यात चांदीच्या दरात १% पर्यंत वाढ गेल्या तिमाहीत झाली होती. मात्र पुन्हा बाजारातील पुरवठा वाढल्याने व मागणीत तुलनात्मकदृष्ट्या घट झाल्याने चांदी स्थिरावली होती. आजही चांदी स्थिरावली आहे. चांदीच्या प्रति ग्रॅम दर ११० रूपयांवर कायम आहे व प्रति किलो किंमत ११०००० रूपयांवर कायम आहे. एमसीएक्सवरील चांदीच्या निर्देशांकात सकाळपर्यंत ०.०१% वाढ झाली असून दरपातळी १०४४३८ रूपयांवर आहे. चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात ०.१४% वाढ होत चांदीचा आंतरराष्ट्रीय दर ३७.१३ डॉलरवर पोहोचला.


मोतीलाल ओसवाल कंपनीच्या अहवालानुसार, सोन्याच्या किमतीत प्रभावी वाढ झाली आहे. या तेजीला अनेक घटकांनी चालना दिली आहे. अहवालातील माहितीनुसार, भू-राजकीय तणावामुळे होणारा धोका कमी झाला आहे, विशेषतः इस्रा यल-इराण आणि रशिया-युक्रेन संबंधांचा पार्श्वभूमीवर तसेच टॅरिफ वाद शांत झाल्यामुळे व्यापाराशी संबंधित अनिश्चितता कमी होत आहेत. दर कपातीची अपेक्षा विलंबित झाली आहे ज्यामुळे अन्यथा किमती आणखी वाढू शकल्या असत्या अ से अहवालात त्यांनी म्हटले आहे. मोतीलाल ओसवालने त्यांच्या डेटात म्हटले,' सोन्यात गुंतवणूकदारांनी ३०% पेक्षा जास्त नफा पाहिला आहे आणि गेल्या २५ वर्षांतील ऐतिहासिक डेटावरून असे दिसून येते की कॉमेक्स गोल्डने कधीही एकाच वर्षात ३२% पेक्षा जास्त परतावा मिळवला नाही.


गुंतवणूकदारांना मोतीलाल यांच्या रिसर्च नोटमध्ये म्हटले आहे, 'दीर्घ काळासाठी पोझिशन्स असलेले टॅक्टिकल ट्रेडर्स ९६,००० रुपयांपेक्षा कमी स्थिर बंद झाल्यावर हेजिंग किंवा बाहेर पडण्याचा विचार करू शकतात.दीर्घ काळासाठी पोझि शन्स असलेले टॅक्टिकल ट्रेडर्स ९६,००० रुपयांपेक्षा कमी स्थिर बंद झाल्यावर हेजिंग किंवा बाहेर पडण्याचा विचार करू शकतात.'

Comments
Add Comment

'प्रहार' शनिवार विशेष: भारतीय रिटस्मध्ये गुंतवणूकीचा प्रारंभ कसा कराल: चार टप्प्यांवर आधारलेले सोपे मार्गदर्शन !

लेखक - प्रतिक दंतरा (हेड  इन्व्हेस्टर रिलेशन्स अ‍ॅण्ड स्ट्रॅटेजी, नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट अ‍ॅण्ड एक्झिक्युटिव्ह

अमरनाथ यात्रा मार्गावर भीषण अपघात: ५ बस एकमेकांवर आदळल्या, ३६ यात्रेकरू जखमी!

जम्मू: अमरनाथ यात्रेला निघालेल्या भाविकांवर आज दुर्दैवी प्रसंग ओढवला. जम्मू आणि काश्मीरमधील रामबन

Policybazaar: 'पॉलिसीबझार' व Whilter.AI कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी एकत्र

मुंबई: ऑनलाइन विमा बाजारपेठ असलेल्या पॉलिसीबाजारने (Policy Bazaar) ग्राहक धारणा आणि गुंतवणूक धोरणात बदल करण्यासाठी Whilter.AI

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये मुसळधार; २४ जणांचा बळी, २० हून अधिक मुली बेपत्ता!

वॉशिंग्टन डीसी: अमेरिकेच्या टेक्सास राज्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या अचानक पूरस्थितीने भीषण हाहाकार माजवला

Zerodha Nitin Kamat: जेन स्ट्रीट प्रकरणानंतर झेरोडाचे संस्थापक नितीन कामत यांनी बाजारावर व्यक्त केली 'ही' चिंता !

प्रतिनिधी: जेन स्ट्रीट प्रकरणानंतर बाजारात संशयाचे वातावरण घोघांवत आहे. त्याशिवाय बाजारातील परिस्थिती मजबूत

Grand Chess Tour 2025 : गुकेशची कमाल! कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं अन् गुकेशनं त्याच्याचं नाकावर टिच्चून 'रॅपिड' स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं

नवी दिल्ली : क्रोएशियातील झाग्रेब येथे झालेल्या ग्रँड चेस टूर २०२५ रॅपिड अँड ब्लिट्झमध्ये विद्यमान विश्वविजेता