Bihar polls: सॅनिटरी पॅडवर राहुल गांधींचा फोटो; 'हा महिलांचा अपमान' महिलांची टीका

  63

पाटणा : बिहार काँग्रेसने "प्रियदर्शिनी उड्डाण योजना" अंतर्गत पाच लाख सॅनिटरी पॅड बॉक्स वाटप करण्याची घोषणा केली असता खासदार राहुल गांधी यांचा फोटो त्या बॉक्सवर छापल्यामुळे बिहारमध्ये राजकीय वाद निर्माण झाले आहे. एनडीएने या हालचालीवर टीका करत महिलांचा "थेट अपमान" असे म्हटले आहे.


बिहार काँग्रेसचे अध्यक्ष राजेश कुमार यांनी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्का लांबा यांच्या उपस्थितीत या योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण महिलांमध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेची जागरूकता वाढवणे असल्याचे सांगितले.


"आमच्याकडे बिहारमधील महिलांसाठी विशेष योजना आहे. आम्ही महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स देऊन त्यासाठी व्यापक मोहीम राबवणार आहोत," असे कुमार यांनी पत्रकारांना सांगितले.


परंतु राहुल यांचा फोटो असलेला सॅनिटरी पॅड बॉक्स दाखवताना वाद निर्माण झाला. त्या बॉक्सवर इंडिया आघाडीच्या प्रस्तावित "माई बहिन मान योजना" देखील छापली होती, ज्यामध्ये सत्तेत आल्यास महिलांना मासिक २५०० रुपयांची मदत देण्याचे वचन दिले आहे.





जेडीयूचे आमदार परिषद सदस्य आणि प्रवक्ते नीरज कुमार यांनी काँग्रेसवर महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का दिल्याचा आरोप केला. "काँग्रेसने त्यांच्या सहयोगी आरजेडीच्या राजकारणाची पद्धत स्वीकारली आहे असे दिसते. आमचे नेते नितीश कुमार महिला सबलीकरणासाठी अथक परिश्रम घेत आहेत आणि त्याचे परिणाम दिसत आहेत. परंतु काँग्रेसने महिलांच्या प्रतिष्ठेचा अपमान केला आहे," असे ते म्हणाले.


भाजपाचे प्रवक्ते कुंतल कृष्ण यांनी देखील समान भावना व्यक्त केल्या. "बिहारमधील महिलांसाठी जे काही करायचे आहे ते सरकार करत आहे. परंतु येत्या विधानसभा निवडणुकांत आपल्या संधींबद्दल चिंतित असलेल्या काँग्रेसने आपली वैचारिक दिवाळखोरी दाखवली आहे. त्यांचे नेते राहुल गांधी योग्यतेचे नसल्यामुळे ते कुप्रसिद्ध आहेत. हा गुण संपूर्ण पक्षाला लागला आहे," असे ते म्हणाले.


महिलांनी या डिझाइनवर नाराजी व्यक्त केली. मुझफ्फरपूरची एक महिला म्हणाली, "सॅनिटरी पॅड वापरताना पुरुषाचे चित्र दिसणे हा महिलांचा अपमान आहे. महिला मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी काँग्रेस खूप खाली पातळीवर जात आहे. राहुल 'पॅड मॅन' बनण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु पक्षाची मोहीम सुरू करण्याचा हा योग्य मार्ग नाही."


मोहिमेचा बचाव करताना लांबा म्हणाली, "आधुनिक युगात प्रश्न हा नसावा की राहुल जींचा फोटो सॅनिटरी नॅपकिन बॉक्सवर का लावला, खरा प्रश्न हा आहे की बिहारमधील आमच्या मुली अजूनही मासिक पाळीच्या वेळी कापड वापरण्यास भाग पाडल्या जातात आणि गंभीर आजारांना बळी पडतात, का?"

Comments
Add Comment

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा

Prajwal Revanna : मोठी बातमी, माजी पंतप्रधानांच्या नातूला बलात्कार प्रकरणात जन्मठेप!

बेंगळुरू :  माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू आणि माजी JD(S) खासदार प्रज्वल रेवण्णा (वय ३४) यांना बलात्कार

Kulgam Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी ठार, आठवड्याभरात दुसरी चकमक

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात शुक्रवारी रात्री झालेल्या