शाळेच्या गेटवर विद्यार्थ्याचा वडिलांच्या मांडीवर मृत्यू

  129

बाराबंकी : शाळेच्या गेटवर विद्यार्थ्याचा वडिलांच्या मांडीवर मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथे घडली. सातवीत शिकत असलेला मुलगा वडिलांसोबत कारमधून शाळेत आला. शाळेत जाण्यासाठी मुलगा कारमधून उतरला. पण त्याचवेळी त्याची तब्येत बिघडली आणि तो जमिनीवर कोसळला. बेशुद्ध पडला. हा प्रकार बघून घाबरलेल्या वडिलांनी मुलाला उचलून घेतले. ते जवळच असलेल्या बेंचवर बसले. मुलाला मांडीवर व्यवस्थित ठेवले. नंतर वडील मुलाला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करू लागले. घटनास्थळी उपस्थित असलेली काही जण त्यांच्या मदतीला पुढे आले. सर्व जण मुलाला शुद्धीत आणण्याचे प्रयत्न करू लागले. पण मुलाकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर वडिलांनी मुलाला जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन मुलाचा मृत्यू झाला असल्याचे जाहीर केले.

सातवीत शिकणाऱ्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना उत्तर प्रदेशमधील बाराबंकीतल्या फतेहपूर तहसील क्षेत्रात घडली. व्यवसायाने वकील असलेल्या जितेंद्र यांच्या मुलाचा शाळेच्या गेटजवळ मृत्यू झाला. जितेंद्र यांच्या मुलाला कोणताही आजार नव्हता. यामुळे मुलाचा आकस्मिक मृत्यू कसा झाला हा प्रश्न जितेंद्र यांना सतावत आहे. जितेंद्र यांच्या पत्नीला पोटच्या मुलाच्या मृत्यूने धक्का बसला आहे. मुलगा या जगातून कायमचा गेला आहे यावर त्यांचा अद्याप विश्वास बसलेला नाही.

मुलाच्या मृत्यानंतर नातलगांनी पोस्टमॉर्टेम न करताच मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे मृत्यूचे नेमके कारण समजले नाही.
Comments
Add Comment

Uttarkashi : धरालीतील 'कल्प केदार' मंदिराची दुर्दैवी पुनरावृत्ती; ८० वर्षांपूर्वी सापडले, आज पुन्हा गडप

धरालीचे प्राचीन शिवमंदिर ढगफुटीच्या तडाख्यात उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात

राहुल गांधींना सशर्त जामीन

चाईबासा : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना झारखंडमधील चाईबासा येथील विशेष खासदार-आमदार न्यायालयात

Uttarkashi : उत्तरकाशीत पूर आपत्तीची झळ अधिक तीव्र; पुराच्या तडाख्यात ६० बेपत्ता, मदतकार्यासाठी शर्यत सुरू

उत्तरकाशी : मंगळवारी उत्तराखंडमधील उत्तरकाशीत एक धक्कादायक घटना घडली. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात

Eknath Shinde : शिंदेंची दौड पुन्हा दिल्लीत! शाह-मोदी भेटीत शिवसेनेच्या नाराजीचा हिशेब?

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्लीत दाखल

भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत

नोवाक जोकोविचची ‘सिनसिनाटी ओपन’मधून माघार

नवी दिल्ली : ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविचला आगामी यूएस ओपनपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. त्याने सिनसिनाटी