राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक

  25

मुंबईत सर्वाधिक, तर पुण्यात संख्येत घट


मुंबई : कधीकाळी कुपोषित बालकांचा जिल्हा अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा प्रदेश ओळखला जात. मात्र, नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार कुपोषित बालकांच्या संख्येत महानगरांमध्येच वाढ झाल्याचे चित्र आहे. राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. तब्बल १ लाख ८२ हजार ४४३ बालकं कुपोषित असल्याची सरकारची आकडेवारी असून सर्वाधिक कुपोषित बालक मुंबई उपनगरात असल्याचे धक्कादायक वास्तव देखील या आकडेवारीतून समोर आलं आहे. राज्यामध्ये मध्यम कुपोषित बालकांची संख्या १ लाख ५१ हजार ६४३ असून तीव्र कुपोषित बालकांची संख्या ३०,८०० एवढी आहे. पुण्यातही कुपोषित बालकांची संख्या चिंताजनक असल्याचं चित्र आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये कुपोषणाच्या आकडेवारीत वाढ झाली असून मुंबई उपनगरमध्ये १६ हजार ३४४ कुपोषित बालके आहेत. त्यात, मध्यम कुपोषित बालकांची संख्या १३,४५७तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या २८८७ एवढी आहे. राज्यामध्ये मध्यम कुपोषित बालकांची संख्या १ लाख ५१ हजार ६४३ असून तीव्र कुपोषित बालकांची संख्या ३०,८०० एवढी आहे. मुंबई उपनगराच्या पाठोपाठ नाशिक जिल्ह्यामध्ये कुपोषणाची संख्या वाढली. नाशिक मध्ये ९ हजार ८५२ कुपोषित बालकांची संख्या असून यात मध्यम कुपोषित बालकांची संख्या ८,९४४ तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या १८५२ एवढी आहे. पुण्यातील मध्यम कुपोषित बालकांची संख्या ७,४१०


ठाणे जिल्ह्यात मध्यम कुपोषित बालकांची संख्या ७,३६६ आणि तीव्र कुपोषित बालकांची संख्या ८४४ एवढी आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्यातील कुपोषित बालकांची पुण्यातील संख्या कमी आहे. पुण्यात मध्यम कुपोषित बालके ७,४१०तर तीव्र कुपोषित बालके १६६६एवढी आहेत. धुळे जिल्हा मध्यम कुपोषित बालके ६,३७७ आणि तीव्र कुपोषित बालके १७४१आहेत. छत्रपती संभाजी नगर जिल्हा मध्यम कुपोषित बालके ६४८७ तर तीव्र कुपोषित बालके १४३९आहेत. नागपूर मध्यम कुपोषित बालके ६,७१५ तर तीव्र कुपोषित बालके १३७३ एवढी आहेत. कुपोषण कमी करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या योजना आणि होणारा खर्च यावरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचंही आकडेवारीतून समोर येत आहे.

Comments
Add Comment

‘जय गुजरात’: पवारांचा दाखला देत फडणवीसांकडून शिंदेंची पाठराखण!

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'जय गुजरात' या घोषणेमुळे तापले आहे.

जसलोक हॉस्पिटलने टर्मिनल प्रोस्टेट कर्करोगाने पीडित रूग्‍णाचे प्राण वाचवले

७००० पेक्षा कमी प्‍लेटलेट असलेल्‍या रुग्णावर ल्‍युटेशियम थेरपी करत रचला इतिहास  मुंबई: प्रगत कर्करोग

राज्यात २४ तास वाळू वाहतुकीला परवानगी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यात वाळू वाहतुकीसंदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई : भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

Chandrashekhar Bawankule : भूमी गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन! महसूल मंत्री बावनकुळेंची विधानसभेत घोषणा

आठ मुद्रांक अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत मुंबई : नाशिक जिल्ह्यातील संगमेश्वर येथील भूमाफियांनी केलेल्या

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.