Meesho IPO: मिशो कंपनीचा ४२५० कोटींचा आयपीओ येणार! DHRP File केला

  55

प्रतिनिधी: भारतातील मजबूत फंडामेंटलचा आधारे घरगुती गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात आयपीओत गुंतवणूक सुरु केली आहे. याबाबतचे विविध रिपोर्ट वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. याच धर्तीवर मिशो (Meesho) कंपनीने डीएचआरपी (Drafts Red Hearing Prospectus DHRP) फाईलिंग सेबी या नियामक मंडळाकडे केले आहे. ४२५० कोटींचा आयपीओ असणार आहे. इ कॉमर्स संकेतस्थळ असलेल्या मिशोने आयपीओतून एकूण ८५०० कोटींची उभार णी करण्याचे ठरवले आहे. मात्र कंपनीने यासंदर्भात अधिक माहिती आणि गुपिते रेग्युलेटरी फायलिंगमधून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. प्रामुख्याने इ कॉमर्स संकेतस्थळांची वाढती स्पर्धा पाहता हा निर्णय कंपनीने घेतलेला आहे.


मिशोचा संचालक मंडळाने व समभागधारकांनी याला अधिकृत मान्यता दिल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. स्वतः कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,कंपनीला आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ५३ कोटींचे नुकसान झाले होते. याशिवाय कंपनी च्या ऑपरेटिंग नफ्यात मात्र ३३% वाढ झाली होती. त्यामुळे कंपनीचा हा ऑपरेटिंग नफा ७६१५ कोटीवर पोहोचला होता. त्या मागील वर्षाच्या तुलनेत कंपनीने आपल्या एकूण नुकसानात ९७% घट केली होती. याच धर्तीवर कंपनीने आपल्या रणनीती आखत आयपीओचा मार्ग निवडून बाजारातून निधी उभारण्याचे ठरवले आहे.


मागे झालेल्या बाह्य निधी उभारणीत (External Funding Round) यामध्ये ५५० दशलक्ष डॉलर्स उभारले होते. या निमित्ताने प्रथमच इ कॉमर्स कंपनी बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, आयपीओसाठी (IPO) कंपनीने जेपी मॉर्गन, मॉर्गन स्टॅनली, सिटी, कोटक महिंद्रा कॅपिटल यांची नियुक्ती केली आहे. या आयपीओत फ्रेश इश्यू, तसेच ऑफर फॉर (OFS) माध्यमातून गुंतवणूक करणार आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ६.२ अब्ज डॉलर्सच्या एकूण व्यापारी मूल्याच्या रन रेटपर्यंत पोहोचलेल्या मीशोने भारतातील तिसरा सर्वात मोठा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणून उदयास येत असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २४ मध्ये महसुलात ३३ टक्के वाढ होऊन ७,६१५ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे, तर गेल्या वर्षीच्या १,५६९ कोटी रुपयांवरून ₹५३ कोटी रुपयांपर्यंत निव्वळ तोटा कमी केला.

Comments
Add Comment

Health: भोपळ्याच्या बिया आणि खजूर, झोपेसाठी उत्तम आहार

मुंबई : रात्री शांत आणि गाढ झोप लागणे हे आजच्या धावपळीच्या जीवनात एक मोठे आव्हान बनले आहे. अनेक जण निद्रानाश आणि

अंडाकरी बनवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने केली आत्महत्या

धमतरी (छत्तीसगढ): छत्तीसगढमधील धमतरी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आली आहे. एका पतीने केवळ त्याच्या

रत्नागिरी : पोटच्या मुलाकडून आईचा सुरीने गळा कापून खून

रत्नागिरी : पोटच्या मुलानेच आपल्या आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि. २६ ऑगस्ट) पहाटे उघडकीस आली. या

Ganeshostav 2025: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावात दाखल झाले आहेत. त्यामुळे

रणबीर-आलियाच्या नवीन घराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आलिया संतापली

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुंबईत एक नवं घर बांधत आहेत, ज्याची किंमत

'अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे'

मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील