Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

IPS सिद्धार्थ कौशल यांचा राजीनामा

IPS सिद्धार्थ कौशल यांचा राजीनामा
नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेत (IPS / Indian Police Services) १३ वर्ष सेवा केल्यानंतर आंध्र प्रदेशमधील आयपीएस अधिकारी सिद्धार्थ कौशल यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. कोणत्याही दबावापोटी राजीनामा दिलेला नाही. स्वच्छेने राजीनामा देत आहे, असे सिद्धार्थ कौशल यांनी सांगितले. सिद्धार्थ कौशल हे २०१२ मध्ये भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. त्यांनी महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) पदापर्यंतच्या जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत. सिद्धार्थ कौशल २०१२ मध्ये आयपीएस झाले आणि त्यानंतर त्यांनी कृष्णा आणि प्रकाशम जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक आणि अलिकडेच आंध्र प्रदेशात महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणून जबाबदाऱ्या हाताळल्या. भारतीय पोलीस सेवेचा स्वेच्छेने राजीनामा देत आहे. हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक कारणास्तव आणि पूर्ण विचार केल्यानंतर घेतला आहे. माझ्या जीवनातील ध्येय आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेनुसार मी हा निर्णय घेतला आहे; असे सिद्धार्थ कौशल यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले राजीनाम्याचा कोणत्याही दबावाशी किंवा छळाशी संबंध नाही; असेही सिद्धार्थ कौशल यांनी सांगितले. भारतीय पोलीस दलात सेवा करणे हा आयुष्यातील सर्वात परिपूर्ण आणि समृद्ध करणारा प्रवास होता, असेही सिद्धार्थ कौशल म्हणाले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा