राज आणि उबाठाच्या सभेवर डॉ. परिणय फुके यांची कविता
मुंबई: राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महाराष्ट्र सरकारच्या हिंदी सक्तीच्या जीआरविरोधात एकत्र मोर्चा काढणार होते. पण, त्यापूर्वीच सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. इतकेच नव्हे तर, आगामी निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष युती करणार असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे हे दोन्ही बंधू उद्या मुंबईत सभा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज विधानपरिषदेत भाजपचे आमदार परिणय फुके यांनी दोन्ही ठाकरे बंधुना समर्पित एक व्यंगात्मक कविता सादर केली. ही कविता चांगलीच गाजत आहे.
"सत्तेसाठी वेगळे झालो सत्तेसाठीच एकत्र आलो..." पहा व्हिडिओ
सध्या आघाडी सरकारचे सामर्थ्य लक्षात घेता, आगामी निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी एकमेकांचे विरोधक असलेले हे ठाकरे बंधु एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी केवळ मायमराठीचा मुद्दा उचलत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न या दोघांचा आहे. आणि याच विषयावर आधारित फुके यांनी कविता केली आहे.