वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे वन बिग ब्युटीफूल विधेयक गुरूवारी रात्री उशिरा संमत झाले. हे हाऊस ऑफ रिप्रेझेंटिटिव्हच्या २१८-२१४च्या अंतराने संमत झाले. हा ट्रम्प यांचा मोठा विजय असल्याचे मानले जात आहे. त्यांच्या कार्यकालातील हे मोठे यश मानले जात आहे. हे विधेयक सीनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटिटिव्हकडून संमत झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले आहे. ते लवकरच यावर स्वाक्षरी करतील.
या विधेयकावर मतदानादरम्यान दोन रिपब्लिकन खासदारांना पक्षाच्या बाजूने न जाता डेमोक्रेटिक पक्षाच्या बाजूने मतदान केले. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधेयक दोन्ही सदनात संमत झाल्याने आनंद व्यक्त केला आहे. ते म्हाणले, मी लाखो कुटुंबांची डेथ टॅक्सपासून सुटका केली.
४ जुलैला स्वाक्षरी समारंभ होणार आहे. या निमित्ताने व्हाईट हाऊसमध्ये पिकनिकचे आयोजन करण्यात येईल. ८००हून अधिक पानांच्या या विधेयकाला संमती मिळवण्यासाठी ट्रम्प यांना मोठी मेहनत घ्यावी लागली. या विधेयकासाठी जीओपी नेत्यांना रात्रभर काम करावे लागले. तसेच ट्रम्प यांनी व्यक्तिगतपणे पुरेशी मते मिळवण्यासाठी होल्डआऊटवर दबावही टाकला.
काय आहे या विधेयकात?
या विधेयकात टॅक्समध्ये कपात, सैन्याचे बजेट, संरक्षण आणि ऊर्जा उत्पादनासाठी वाढलेले खर्च, सोबतच आरोग्य आणि पोषण कार्यक्रमांमध्ये कपात यांचा समावेश आहे. हे विधेयक अवैध प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणातील डिपोर्टेशन खर्च वाढीबाबतही आहे.
NRI आणि भारतीय प्रोफेशनल्सना मोठा दिलासा
या विधेयकामुळे भारतीय प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. अमेरिकेत राहत असलेले ४५ लाख भारतीयांना यामुळे दिलासा मिळणार आहे. या विधेयकात आंतरराष्ट्रीय मनी ट्रान्सफरवरील प्रस्तावित टॅक्स ५ टक्क्यांवरून घटवून १ टक्के करण्यात आला आहे. यामुळे जे भारतीय आपल्या घरी पैसे पाठवतात त्यांना मोठा दिलासा आहे. तसेच विधेयकात असेही नमूद होते की हा टॅक्स केवळ त्या लोकांना लागू असणार आहे जे अमेरिकेचे निवासी आहे मात्र अमेरिकन नागरिक नाही आहेत. यात ग्रीन कार्ड होल्डर, H-1B आणि H-2A व्हिसावर काम करणारे प्रोफेशनल्स आणि परदेशी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.