मुंबई: भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल (Airtel) ने मुंबईतील वाढत्या ऑनलाइन फसवणुकीविरोधात आपल्या मोहिमेत उल्लेखनीय प्रगतीची घोषणा केली आहे.देशभरात एआय (Artificial Inteligence)वर आधा रित फ्रॉड डिटेक्शन सिस्टीम लाँच अंतर्गत एअरटेलने मुंबईत अवघ्या 50 दिवसांत 21 लाखांहून अधिक युजर्सना सफलतेने ऑनलाइन फसवणुकीपासून वाचविले आहे असे कंपनीने घोषित केले. ही अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली सर्व एअरटेल मोबाइल आणि ब्रॉडबँड ग्राहकांसाठी ऑटोमॅटिक पद्धतीने ॲक्टिव्हेट होते. ती एसएमएस, व्हॉट्सॲप, टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, ईमेल आणि इतर ब्राउझर्सरवर पाठविलेली लिंक स्कॅन आणि फिल्टर करते. हे तंत्रज्ञान रिअल-टाइम थ्रेट इंटेलिजन्सचा विशेषतः सायबर धोक्यांबद्दल त्वरित माहितीचा वापर करते आणि दररोज १ अब्जपेक्षा जास्त यूआरएलचे विश्लेषण करते. कोणत्याही धोकादायक साइटवर पोहोचण्यापूर्वी ही सिस्टीम अवघ्या 100 मिलिसेकंदात त्यास ब्लॉक करते.
उदाहरणार्थ, एखादा रहिवासी असा संशयास्पद संदेश प्राप्त करतो की: "आपले पार्सल डिले झाले आहे. ते ट्रॅक करा : http://www.tracky0urparcell.com आणि जर ती व्यक्ती सत्य जाणून न घेता त्या लिंकवर क्लिक करते, तर एअर टेलची एआय-सिस्टीम लगेच सक्रिय होते. ती त्या लिंकला स्कॅन करते आणि जर ती संशयास्पद आहे असे आढळले, तर ती त्या साइटला ब्लॉक करते. युजरला एका चेतावणी संदेशावर रीडायरेक्ट केले जाते, ज्यात लिहिलेले असते: "ब्लॉक केले गेले आहे! एअरटेलला ही साइट धोकादायक वाटली आहे!” ही संपूर्ण प्रोसेस रिअल टाइममध्ये, एका क्षणार्धात होते. अशाच प्रकारच्या जलद इंटरसेप्शनमुळे सर्व प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीपासून युजर्सना वाचविले जात आहे.
या उपक्रमाबद्दल स्वतःचे मत व्यक्त करताना 'भारती एअरटेलचे मुंबईचे सीईओ आदित्य कांकरिया म्हणाले, 'एअरटेलमध्ये ग्राहक सुरक्षा आमच्या प्रत्येक कामाच्या केंद्रस्थानी आहे. मुंबईत आमचे एआय-संचालित फसवणूक शोधून काढण्या चे समाधान लाँच करून आम्ही आमच्या वापरकर्त्यांना डिजिटल धोक्यांपासून वाचविण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल उचलत आहोत. हे नवोपक्रम आमच्या नेटवर्कमध्ये खोलवर रुजलेले आहे, जे ग्राहकाच्या वतीने कोणत्याही कारवाई च्या आवश्यकतेशिवाय सक्रिय सुरक्षा प्रदान करत आहे. डिजिटल वापर वाढत जात असताना, आम्हाला शहरातील लाखो वापरकर्त्यांसाठी सुरक्षित, लवचिक आणि विश्वासार्ह डिजिटल इकोसिस्टीम तयार करण्यात अग्रणी भूमिका बजावण्या चा अभिमान वाटत आहे.'
मुंबई ही देशाच्या सर्वाधिक डिजिटलरित्या विकसित राज्यांपैकी एक गणली जाते, परंतु त्याच वेळी, येथे ऑनलाइन फसवणुकीच्या घटना सुद्धा वाढत आहेत. फ़्रॉड करणारे आता फिशिंग लिंक, बनावट डिलिव्हरी संदेश आणि बनावट बँक अलर्टच्या माध्यमातून लोकांना निशाणा बनवत आहेत. एअरटेलचे हे समाधान संपूर्ण शहरासाठी डिजिटल सुरक्षा कवच म्हणून काम करत आहे - कुटुंबे, वृद्ध, गृहिणी, विद्यार्थी यांना व पहिल्यांदा स्मार्टफोन वापरणाऱ्या युजर्सना सुद्धा सायबर गुन्ह्यांपासून वाचविले जात आहे असे कंपनीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
हे एआय-संचालित प्लॅटफॉर्म युजर्सना त्यांच्या पसंतीच्या भाषेत फ्रॉड अलर्ट पाठवते, ज्यात मराठी सुद्धा सामील आहे. यामुळे शहरातील वैविध्यपूर्ण भाषिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांसाठी ते अत्यंत उपयुक्त ठरत आहे. ही बहुभाषिक सुविधा विशेष रूपाने त्या क्षत्रांमध्ये प्रभावी ठरत आहे जेथे डिजिटल साक्षरता मर्यादित आहे किंवा इंग्रजी भाषेचा वापर कमी आहे.
हे समाधान बॅकग्राऊंड मध्ये कोणत्याही अतिरिक्त इन्स्टॉलेशन शिवाय चुपचाप काम करते आणि ग्राहकांसाठी पूर्णपणे मोफत आहे. मुंबई सारख्या डिजिटल आघाडीच्या शहरात, जेथे ऑनलाइन बँकिंगपासून सरकारी सेवांपर्यंत, सर्व काही वेगाने डिजिटल होत आहे, तेथे एअरटेलचा हा उपक्रम एक सुरक्षित आणि विश्वासार्ह डिजिटल इकोसिस्टीम तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. प्रोफेशनल असो, गृहिणी असो किंवा विद्यार्थी असो - एअरटेल प्रत्येक डिजिटल संवाद पूर्वीपेक्षा खूप जास्त सुरक्षित करत आहे. लाँच केल्यानंतर अवघ्या 50 दिवसांमध्येच एअरटेलने देशभरातील २०३१४५ हून अधिक धोकादायक लिंक्स ब्लॉक केल्या आहेत आणि १२.३ करोडपेक्षा अधिक ग्राहकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित केलेले आहे.