Prahaar Exclusive: 'भारतातील गुंतवणूकदार अतिशय प्रगल्भ' JM Financial Mutual Fund कंपनीने नवा जेएम लार्ज कॅप ॲड मिड कॅप फंड NFO घोषित केला

  47

मोहित सोमण: जेएम फायनांशियल म्युचल फंड (JM Financial Mutual Fund) कंपनीने आज जेएम लार्ज कॅप ॲड मिड कॅप फंड' या नव्या लार्ज कॅप, मिड कॅप गुंतवणूकीसाठी असलेल्या ओपन एंडेड इक्विटी स्कीम (NFO) फंड भारतीय बाजारात लाँच केला आहे. 'भारतीय गुंतवणूकदार आणि भारतीय बाजार प्रगल्भ असून गेल्या पाच ते सहा वर्षांतील कामगिरी पाहिल्यास भारतीय गुंतवणूकदारांनी चढउतार (Volatility) कायम असतानाही आपली गुंतवणूक स्थिर ठेवली' असे प्रतिपादन 'प्रहार' न्यूजशी बोलताना केले आहे.हे प्रतिपादन लाँच दरम्यान जेएम फायनांशियल असेट मॅनेजमेंट कंपनीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ मोहंती यांनी केले.'भारतीय बाजारात निश्चितपणे सध्याच्या काळात भूराजकीय व इतर कारणांमुळे चढउतार असलातरी बाजारातील फंडामेटल मजबूत आहे. या कारणांमुळे जागतिक पातळीवर काही घडले तरी भारतीय गुंतवणूकदारांचा बाजारावर मूलभूत विश्वास कायम आहे ' असेही म्हंटले आहे. लाँचदरम्यान कंपनीने पत्रकार परिषदेत नव्या फंडाची अधिकृत घोषणा यावेळी केली.


'सध्या बाजारात भरपूर स्कोप असून नवीन आशा आकांक्षा गुंतवणूकदारांना तसेच आमच्या कंपनीलाही आहेत. सध्या मिडकॅप व स्मॉलकॅप विशेषतः मिडकॅपने ज्या पद्धतीने परतावा (Return) दिला त्यानुसार यातील भविष्यही उज्ज्वल आहे असे आम्हाला वाटते. आमचा नवा फंडही संपूर्ण सखोल रिसर्च मधून आला असून चांगले कंपाऊंड (Compound) मिळावा यासाठीच आम्ही प्रयत्नशील आहोत. किंबहुना त्यांना चांगला परतावा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील व कटीबद्ध आहोत.'


'प्रहार' ने छोट्या शहरातील गुंतवणूकदारांबद्दल विचारले असता ' छोट्या शहरांतील गुंतवणूकदारही सूज्ञ आहेत. आजच्या काळातील गुंतवणूकदार बाजार चांगल्या प्रकारे जाणतात. त्यामुळे आमचे उत्पादन नक्की माहित असणारे गुंतवणूक दार निश्चितच आमच्यावर विश्वास ठेवतील. जरी म्युचल फंडमधील एप्रिल महिन्यातील एकूण आवक (Inflow) कमी झाली असली तरी म्युचल फंड मधील स्थूल गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.अजूनही या गुंतवणूकीत मोठ्या प्रमाणा त वाढ होणार आहे. नजीकच्या काळात आम्ही याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो. देशाच्या घरगुती बचतीत वाढ होत असली तरी जागतिक पातळीवरील बचतीपेक्षा तुलनेने कमी आहे. यामुळे योग्य उत्पादनात गुंतवणूक करताना आप ल्या निश्चित कारणासाठी गुंतवणूक केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. एसआयपीतही गुंतवणूकीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळाची परिस्थिती अथवा ट्रेंड निश्चित पाहणे कुतुहलाचे ठरणार आहे.


बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना मोहंती पुढे म्हणाले ,'मागील सहा सात महिन्यातील अस्थिरता वाढली असली तरी एसआयपी (SIP) गुंतवणूक कोसळली (Crash) झाली नाही. त्यामुळे मला वाटत ही वाढ पुढेही राहिल. एकदा गुंतव णूकदारांकडे निश्चित ध्येय असेल तर विचलित न होता तो बाजारात आशेचा किरण पाहू शकतो ते केवळ उत्पादनावर असलेला विश्वासच सार्थ ठरतो जो अस्थिरतेला जाणतो. नवीन गुंतवणूकदारांबाबत बोलताना ते पुढे म्हणाले,' नवीन गुंतवणू कदारांना मिडकॅप मध्येच गुंतवणूक केली पाहिजे असे नाही  प्रवेश करणे महत्वाच आहे. कंपाऊंड इफेक्ट (Compound Effect) वाढवणे हे आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचे आहे.'


जेएम नवीन फंड प्रस्ताव (NFO Fund) ४ जुलै २०२५ ते १८ जुलै २०२५ पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. या योजनेचे गुंतवणूक उद्दिष्ट हे उत्कृष्ट व्यवस्थापन गुणवत्ता आणि उद्यम प्रशासन मानके स्थापित केलेल्या कंपन्यांच्या उच्च दर्जाच्या वाढक्षम समभागांमध्ये गुंतवणूक करून परतावा निर्माण करणे आहे असे कंपनीने म्हटले. गुंतवणूक करण्यायोग्य समभाग संचांची निर्मिती ही अंतर्गत जीक्यू - GeeQ (ग्रोथ ऑफ अर्निंग्ज अँड अर्निंग्ज क्वालिटी) या मॉडेलचा वापर करून कर ण्यात आली आहे.


तरलता आणि लवचिकता हे घटक योजनेच्या पोर्टफोलिओ धोरणाच्या कोनशिला आहेत. लार्जकॅप आणि मिडकॅप संधींमध्ये अखंडपणे वहिवाट सुरू राखताना, बदलत्या बाजार परिस्थितीत सातत्यपूर्ण कामगिरी आणि वाढ साध्य करण्या साठी जोखीम व्यवस्थापनाशी तडजोड न करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.फंड युएसपी बाबत बोलल्यास पोर्टफोलिओ गुंतवणूक करताना तरलता (Liquidity),लवचिकता (Flexibility) आणि विवेकपूर्ण जोखीम (Cautious Risk Mana gement) व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित केले आहे. हा फंड मोठ्या कॅप्सच्या स्थिरतेला मिड कॅप्सच्या वाढीच्या क्षमतेशी संतुलित करण्याचा प्रयत्न करतो, बदलत्या परिस्थितीनुसार एक संरचित दृष्टिकोन (Structural Approach) देतो.अ स्थिरतेतून सावरून स्थिर परतावा देण्यासाठी हा फंड जेएस फायनाशियलने डिझाईन केलेला आहे.


नव्या फंड लाँचवर प्रतिक्रिया देताना जेएम फायनान्शियल अ‍ॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक अधिकारी - समभाग (Share) सतीश रामनाथन म्हणाले,' आम्हाला आमचा ‘लार्ज अँड मिड कॅप फंड’ सुरू करताना खूप आनंद होत आहे. हा फंड भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांकडून आकार व स्थिरता आणि उदयोन्मुख मिडकॅप कंपन्यांकडून चैतन्यशीलता असे दोन्ही पैलू प्रदान करतो. आम्हाला विश्वास आहे की हे मिश्रण भारतीय अर्थव्यवस्थेच्या सर्व पैलूंना व्यापण्या साठी एक अद्वितीय संधी ठरेल, जी वाढ मिळवून देतानाच कमी अस्थिरता राखेल. आम्हाला भारताच्या वाढीच्या संधीबद्दल विश्वास आहे आणि खात्री आहे की येणारा काळ हा सर्वोत्तमच असेल. लार्ज कॅप निर्देशांक हा अशा कंपन्यांना प्रस्तुत करतो, ज्यांचा भांडवलावरील खर्च कमी आहे, तर तंत्रज्ञान व बाजारपेठेतील व्याप्ती मोठी आणि त्या त्यांच्या क्षेत्रातील विजेत्या कंपन्या आहेत. पण अशा कंपन्यांची दुसरी बाजू अशीही की त्यांच्या नफ्यातील वाढ ही देशाच्या जीडीपी वाढीशी जुळणारी असते. दुसरीकडे ऑटो अ‍ॅन्सिलरी, मॅन्युफॅक्चरिंग, डिफेन्स, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स या उदयोन्मुख क्षेत्रांना मिडकॅप कंपन्या वाढीचा मार्ग देतात. आमचा ‘लार्ज अँड मिड कॅप फंड’ या मालमत्ता वर्गाद्वारे प्रस्तुत होणारी वाढ आणि स्थिरता हस्तगत करण्याचे उद्दिष्ट ठेवेल.'


या प्रस्तुतीबद्दल बोलताना, जेएम फायनान्शियल अ‍ॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडचे वरिष्ठ निधी व्यवस्थापक - समभाग, असित भांडारकर म्हणाले, 'आमच्या नवीन ‘लार्ज अँड मिड कॅप फंडा’द्वारे आम्ही ब्लू-चिप दिग्गजांची स्थिरता आणि लवचिकता त्याचबरोबर उदयोन्मुख नेत्यांची वाढीची क्षमता एकत्र आणली आहे. ही आणखी एक दाखल झालेली केवळ योजना नाही, तर ती आकारमान आणि जलद वाढीचे एक शक्तिशाली मिश्रण आहे, जे उद्याच्या संधींचा फायदा घेण्यासाठी विकसित केले गेले आहे. भारतीय भांडवली बाजार हा मोठ्या अस्थिरतेच्या काळातून जात आहे, जेथे परतावा क्षमता असलेले मिडकॅप्स आणि जोखीम कार्यक्षम लार्जकॅप्स असलेली ही योजना चांगला गुंतवणूक अनुभव देऊ शकते. आम्हाला विश्वास आहे की आमचे वाढ आणि गुणवत्ता केंद्रित गुंतवणूक तत्वज्ञान, एक शिस्तबद्ध आणि प्रक्रिया-चालित गुंतवणूक दृष्टिकोन आणि एक अनुभवी समभागसंलग्न निधी व्यवस्थापन संघ आम्हाला या अशांत काळातून मार्ग काढण्यास आणि एक मजबूत पोर्टफोलिओ तयार करण्यास मदत करू शकेल. ज्यामुळे गुंतवणूकदारांना इच्छित संपत्ती निर्मिती शक्य होईल.'


असित भांडारकर आणि दीपक गुप्ता हे या योजनेचे अनुक्रमे निधी व्यवस्थापक आणि सह-निधी व्यवस्थापक आहेत. भांडारकर संयुक्तपणे जेएम फायनान्शियल म्युच्युअल फंडच्या इतर इक्विटी योजनांचे देखील व्यवस्थापन पाहतात. अशा प्रमुख योजनांमध्ये जेएम फ्लेक्सीकॅप फंडाचा समावेश आहे.गुप्ता हे जेएम टॅक्स सेव्हर फंड आणि जेएम लार्ज कॅप फंडाचे व्यवस्थापन पाहतात, तसेच इतर विविध इक्विटी योजनांमध्ये ते सह-व्यवस्थापक आहेत. सुश्री रुची फोजदार या ‘जे एम लार्ज अँड मिड कॅप फंडा’च्या रोखेसंलग्न (डेट) गुंतवणूक विभागाची देखरेख करतील. इतर इक्विटी योजनांच्या डेट घटकांचे आणि जेएम फायनान्शियल म्युच्युअल फंडाच्या डेट-ओरिएंटेड योजनांचे संयुक्तपणे व्यवस्थापन देखील त्या पाहात आहेत असे कंपनीने नव्या फंडाबाबत माहिती देताना म्हटले आहे.


जून महिन्यापर्यंत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये मोठी वाढ झाली होती. ज्यामध्ये गुंतवणूकदारांना चांगला नफा अथवा परतावा मिळाला होता. रिपोर्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे, एप्रिलपर्यंत या प्रकारच्या समभागातील गुंतवणूक जवळपास १०% हून अधिक प्रमाणात वाढली होती. मात्र काही विश्लेषकांनी मात्र मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये होणारी वाढ अनैसर्गिक व फुगवलेली आहे असे म्हटले होते. परंतु वस्तुस्थिती विविध अहवालानुसार, पाहता लार्ज कॅपपेक्षा अधिक परतावा मिडकॅपने गे ल्या वर्षभरात दिला आहे.


जेएम फायनान्शियल ग्रुपचा भाग असलेली, जेएम फायनान्शियल असेट मॅनेजमेंट लिमिटेड ही भारतातील आघाडीची मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे जी व्यक्ती आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांना गुंतवणूक उपायांची विस्तृत श्रेणी (Divers ified Options) देते. अनुभवी गुंतवणूक व्यावसायिकांच्या टीम आणि कामगिरीचा मजबूत दीर्घकालीन ट्रॅक रेकॉर्डसह, जेएम फायनान्शियल असेट मॅनेजमेंट लिमिटेड त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या अद्वितीय गरजा आणि उद्दिष्टे पूर्ण करणारे ना विन्यपूर्ण आणि सानुकूलित गुंतवणूक उपाय प्रदान करण्यास वचनबद्ध आहे असे कंपनीने यावेळी म्हटले आहे.


३१ मे २०२५ पर्यंत कंपनीकडे जवळजवळ २८,५००+ भागीदार (Partners) आहेत, जे सध्या अंदाजे ९.१५ लाख गुंतवणूकदार फोलिओंना सेवा देतात. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीची व्यवस्थापनाखालील अंतर्गत मालमत्ता (Asset Under Management AUM) १३,८६९.०३ कोटी रुपये आहे ज्यापैकी ११,१२९.९५ कोटींमध्ये हायब्रिड योजनांसह इक्विटी योजनांचा समावेश आहे. कंपनीने पोर्टफोलिओ मुल्यांकन - ३१ मार्च २०२५ रोजी व्यवस्थापनाखालील मालमत्ता (A UM) (कोट्यवधींमध्ये)- १३,४१९.२९ मध्ये इक्विटी समाविष्ट आहे: ९,०२७.१५, कर्ज: ६४५.३६ हायब्रिड: ९४०.७८, तरलता: २,८०५.९९, तिमाही भौगोलिक प्रसार (%): शीर्ष ५ शहरे: ६४.५७%, पुढील १० शहरे: १३.४९%, पुढील २० शहरे ४.१७%, इतर: १७.७७% (३१ मार्च २०२५ रोजीचा डेटानुसार) सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी

"बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांमध्ये केवळ गुणवत्तेच्या आधारेच प्रवेश’’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

मुंबई: बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध

ENG vs IND: शुभमन गिलने द्विशतक ठोकत रचला इतिहास, कोहलीचा रेकॉर्ड मोडला

एजबेस्टन: इंग्लंडविरुद्ध एजबेस्टन कसोटीत कर्णधार शुभमन गिलचा जलवा पाहायला मिळत आहे. शुभमन गिलने भारताच्या

Prahaar Explainer: भारतीय अर्थव्यवस्था सुदृढ असताना अमेरिकन अर्थव्यवस्थेत नवे बिकट वळण? टेक्सासवर चलन म्हणून सोने चांदी स्विकारण्याची पाळी? जाणून घ्या सविस्तर माहिती

प्रतिनिधी:अमेरिकेतील टेक्सास सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. जगभरात या निर्णयाचे आश्चर्य व्यक्त केले जात

भाजपा आमदार किसन कथोरेंच्या बंगल्याबाहेर गोळीबार

बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्याबाहेर गोळीबार झाला. या गोळीबारात

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई