Thursday, October 30, 2025
Happy Diwali

पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंटवर भारतात बंदी

पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंटवर भारतात बंदी
नवी दिल्ली : पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंटवर भारतात बंदी लागू करण्यात आली आहे. भारत सरकारने निर्देश दिल्यानंतर इन्स्टाग्रामने पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंट भारतात दिसणार नाही, अशी व्यवस्था केली आहे. फवाद खान, माहिरा खान, मावरा होकेन, हानिया आमिर अशा एकूण २४ पाकिस्तानी सेलिब्रेटींची इन्स्टा अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आली आहेत. पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी भारतात पहलगाम येथे अतिरेकी हल्ला केला होता. या घटनेनंतर भारत - पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण झाला. भारत सरकारने पाकिस्तानमधून हाताळली जाणारी तसेच पाकिस्तानच्या नागरिकांची अशी अनेक सोशल मीडिया अकाउंट, यू ट्युब चॅनल ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत सरकारने बंदी घातलेल्या पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सच्या संख्येत वाढ झाली. पण मागील काही तासांपासून निवडक पाकिस्तानी सेलिब्रेटींची इन्स्टा अकाउंट भारतात दिसण्यास सुरुवात झाली होती. हा प्रकार लक्षात येताच तातडीने कारवाई करुन भारत सरकारने २४ पाकिस्तानी सेलिब्रेटींची इन्स्टा अकाउंट भारतात पुन्हा ब्लॉक केली. देशाच्या सुरक्षिततेसाठी तसेच अपप्रचाराला खीळ घालण्यासाठी भारताने पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देशात बंदी घातली आहे. सरदारजी ३ या सिनेमात एका पाकिस्तानी अभिनेत्रीने काम केले आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित करण्यास भारत सरकारने परवानगी नाकारली आहे.
Comments
Add Comment