कन्नड तहसील कार्यालयासमोरची नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात ठिकठिकाणी सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक जुनं बांधकाम असलेल्या इमारतींची पडझड होण्याच्या घटना घडत आहेत. याच कारणामुळे प्रशासन दरवर्षी पावसाळ्याआधी अती धोकादायक इमारती पाडते आणि धोकादायक इमारतींची डागडुजी करण्याचे निर्देश देते. पण महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड शहरात धक्कादायक घटना घडली. कन्नड तहसील कार्यालयासमोरची नगरपालिकेची जुनी इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी धाडकन कोसळली.

कन्नड तहसील कार्यालयात नेहमीप्रमाणे काम सुरू होते. अचानक दुपारी मोठा आवाज ऐकू आला. घाबरलेल्या नागरिकांनी आवाजाच्या दिशेने बघितले. त्यावेळी कन्नड तहसील कार्यालयासमोरची नगरपालिकेची जुनी इमारत कोसळत असल्याचे नागरिकांना दिसले. अनेकांच्या डोळ्यांसमोर इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी धाडकन कोसळली. इमारतीचा जो भाग कोसळला त्या भागातील सर्व रहिवासी आणि दुकानदार स्थलांतरित झाले होते. काही दुकानं बंद होती. यामुळे जीवितहानी झालेली नाही.

इमारत पडत असतानाचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यात इमारत कोसळताच मोठ्या प्रमाणात धूळ उडाल्याचे दिसते. इमारत कोसळत असल्याचे बघून घाबरलेले नागरिक आणि त्यांची धावपळ पण व्हिडीओत दिसत आहे.
Comments
Add Comment

बेकायदेशीर कत्तलीसाठी नेलेला जनावरांचा कंटेनर परभणीत जप्त, चालक ताब्यात

परभणी : पथरी-माजलगाव रस्त्यावरील पोखर्णी फाटा परिसरात बेकायदेशीर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा एक कंटेनर सतर्क

गणेशोत्सवाला गालबोट - पुण्यात गणेश कोमकरच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या

पुणे : ऐन गणेश विसर्जनाच्या तयारीत असतानाच पुण्यामध्ये सणाला गालबोट लागले. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या

मराठा आरक्षण - मृतांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत

मुंबई : मराठा समाजास आरक्षण मिळण्याकरीता ज्यांनी आत्महत्या केली किंवा आंदोलना दरम्यान ज्यांचा मृत्यू झाला. अशा

Weather Alert: विसर्जनाच्या दिवशी मुसळधार पाऊस, आयएमडीचा महाराष्ट्रासाठी मोठा इशारा

नवी दिल्ली: आज महाराष्ट्रात अनंत चतुर्दशी साजरी केली जात असून, आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनात सर्व

मोठी भरती! महाराष्ट्रात अनुकंपा आधारावर होणार मेगा भरती!, १०,००० रिक्त पदे भरली जाणार

दिवाळीपूर्वी सरकार देणार सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मुंबई: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून

Pune Crime: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलं समोर

पुणे: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठेत आयुष (गोविंदा) गणेश