बस आणि रिक्षा-टॅक्सीनंतर आता कॅब प्रवास ही महागला..! ओला, उबेर, रॅपिडोच्या भाडेदरात दुप्पट वाढ

मुंबई: सध्या महागाई इतकी वाढत चालली आहे की, त्याचा फटका मध्यमवर्गीयांना पडत आहे. बस आणि रिक्षा-टॅक्सीनंतर आता कॅब प्रवास देखील महागला आहे. आजकाल अनेक लोकं सुरक्षित आणि सोईस्कर प्रवासाठी ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या ॲप आधारित प्रवासी वाहन सेवांचा वापर करतात. मात्र 1 जुलैपासून लागू झालेल्या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार या सेवा प्रदात्यांना आता गर्दीच्या वेळेत मूळ भाड्याच्या दुप्पट दराने भाडं आकारता येणार आहे.

ओला, उबर, रॅपिडो सेवा प्रदात्यांना पीक अवर्समध्ये भाडे दुप्पट आकारण्यास केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून परवानगी देण्यात आली आहे.  याआधी ही मर्यादा दीडपट होती. याशिवाय, गर्दी नसलेल्या वेळेतही किमान भाड्याच्या ५०% आकारणी अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.

तीन महिन्यांत नियम लागू


देशातील सर्व राज्यांनी पुढील तीन महिन्यांत हे मार्गदर्शक नियम लागू करावेत, असा सल्ला केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत ओला-उबरच्या दरात वाढ निश्चित मानली जात आहे. यामध्ये ‘डेड मायलेज’ अर्थात प्रवाशाला पिकअप करण्यासाठी चालकाने जे अंतर पार केलं, त्याच्या इंधनाचा विचार करून कमीत कमी तीन किलोमीटरचं मूळ भाडं अनिवार्य ठरवण्यात आलं आहे.

यामुळे प्रवाशांना गर्दीच्या वेळेत किंवा अल्प मागणीच्या वेळेतही आता जास्त दराने प्रवास करावा लागणार आहे. काही ग्राहकांसाठी ही सेवा आधीच महाग वाटत होती, त्यात आता अधिक आर्थिक तडजोड करावी लागणार आहे.

स्थानिक रिक्षा-टॅक्सी चालकांमध्ये संताप


ॲप आधारित सेवांमुळे स्थानिक रिक्षा व पारंपरिक टॅक्सी चालकांमध्ये मोठा असंतोष आहे. अनेक ठिकाणी स्थानिक चालक आणि ॲप सेवा चालक यांच्यात वाद, तक्रारी आणि संघर्षाचे प्रसंग समोर आले आहेत. ग्राहकांकडूनही भाड्याच्या लूट आणि सेवा गुणवत्तेवर टीका करण्यात येत आहे.

सरकारच्या या नव्या नियमामुळे स्थानिक वाहनचालकांची अस्वस्थता अधिकच वाढली असून, सरकारी परवानगी नसलेल्या कंपन्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
Comments
Add Comment

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

महाराष्ट्र शासनाचे रत्ने व आभूषणे धोरण जाहीर

मुंबई : राज्य सरकारनं रत्ने आणि आभूषण उद्योगाला जागतिक स्पर्धेत आघाडीवर नेण्यासाठी राज्य शासनाने ‘रत्ने व

पर्यावरणवादी पद्मश्री सालूमरदा थिमक्का यांचे निधन

वयाच्या ११४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास नवी दिल्ली : प्रसिद्ध पर्यावरणवादी, पद्मश्री पुरस्कार विजेत्या

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा