मुंबईत गिरगाव चौपाटीवर लक्ष्मण हाकेंचं आंदोलन, पाण्यात उभं राहून घोषणाबाजी

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण कमी करू नये, ही मागणी घेऊन लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत. लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकांनी आज म्हणजेच गुरुवारी ३ जुलै रोजी गिरगाव चौपाटी येथे पाण्यात उतरुन आंदोलन केले. विधान भवनात पावसाळी अधिवेशन सुरू असल्याचे लक्षात ठेवून हाके आणि त्यांच्या समर्थकांनी मुंबईत गिरगाव चौपाटी येथे पाण्यात उतरुन आंदोलन केले.

ओबीसी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी लक्ष्मण हाके आणि त्यांचे समर्थक थेट समुद्राच्या पाण्यात उतरले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सोबत आणलेले बॅनर झळकवले. 'उठ ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो' अशी घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोलकांनी सरकारमधील ओबीसी नेत्यांचा आणि मंत्र्यांचाही निषेध केला.

राज्य सरकारकडून सारथी आणि बार्टी सारख्या योजनांना जेवढे अनुदान मिळते त्या तुलनेत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या महाज्योती योजनेला पुरेसे अनुदान मिळत नाही, असा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला. मागील तीन वर्षांपासून महाज्योती योजनेला सारथी आणि बार्टीच्या तुलनेत कमी महत्त्व दिले जात आहे, असाही आरोप विद्यार्थ्यांनी केला. सरकार दखल घेत नसल्यामुळे समुद्रात उतरुन आंदोलन करण्याची वेळ आली, असेही आंदोलक विद्यार्थी म्हणाले.

 
Comments
Add Comment

BMC : मानखुर्द आणि गोवंडी परिसरातील स्वच्छतेविषयक कामांची आयुक्तांनी केली पाहणी, असे दिले निर्देश..

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांनी पूर्व उपनगरातील मानखुर्द आणि गोवंडी परिसरातील

Redevelopment of Pagdi Buildings : मुंबईतील पागडी इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न; जुने भाडेकरुन आजही आपल्या हक्काच्या घरापासून वंचित

- सुधार समितीत सदस्यांनी व्यक्त केली चिंता मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील पागडी तत्वावरील अर्थात ना उपकर

Mulund Dumping Ground : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची जागा धारावी विकास प्रकल्पाला देण्याचा प्रस्ताव लांबणीवर

भाडेपट्ट्यांवर देण्याचा प्रस्ताव सुधार समितीने ठेवला राखून पुढील बैठकीत निर्णय होण्याची शक्यता मुंबई

BMC News : सेव्हन हिल्स रुग्णालयाचा तिढा सुटला, सुधार समितीने दिली मंजुरी

आता ७६ खाटा आणि नंतर मिळणार ३०० खाटा महापालिकेला सेव्हन हिल्स हेल्थकेअरसोबत कॅप्री ग्लोबलसोबत करार करण्यास

FDA Raid : सीसीआय', 'एमआयजी क्लब', जुहू जिमखान्यासह नामांकित क्लबवर 'एफडीए'ची कारवाई

परवाने निलंबित; स्वयंपाकघरांमध्ये माश्या, झुरळांचा सुळसुळाट, बुरशी लागलेल्या भाज्या आणि अस्वच्छतेचे

Drug Free Mumbai : 'ड्रग्ज फ्री मुंबई'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी ३० जुलै २०२६ रोजी शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  तरूणाईला व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी योग्य