नगरपालिका शाळेच्या मुख्याध्यापकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, कारण...

संपूर्ण शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ


कोल्हापूर: राज्यात गेल्या काही दिवसांत शिक्षकांच्या आत्महत्येच्या घटना वाढत असल्याचं चित्र आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कागल नगरपालिकेच्या शाळेत कार्यरत असलेल्या मुख्याध्यापक मारुती व्हरकट यांनी विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तातडीने शोधकार्य सुरू केलं. अग्निशमन विभागाच्या मदतीने आज सकाळी मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी यावेळी घटनास्थळी जमली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

मारुती व्हरकट हे कागल नगरपालिकेच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आत्महत्या का केली, यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यांच्या अचानक घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे नातेवाईक, सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येमागील कारण स्पष्ट होण्यासाठी पोलीस विविध अंगाने तपास करत आहेत.
Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

या ५ तेलांचा उपयोग ठरेल केसांसाठी वरदान !

केसांची काळजी घेणे हे अनेकांसाठी खूप महत्वाचे असते. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी ट्राय करण्याची इच्छा असते, पण

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र