Wednesday, July 2, 2025

बीडमधील लैंगिक शोषणाची होणार एसआयटी चौकशी

बीडमधील लैंगिक शोषणाची होणार एसआयटी चौकशी

मुंबई : बीड येथील शिकवणी वर्गात झालेल्या मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची वरिष्ठ आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे का, यात कोणाचा वरदहस्त आहे का हे देखील तपासले जाईल. मुलींना न्याय मिळावा यादृष्टीने योग्य प्रयत्न करू. या प्रकरणातील नराधमांना कठोर शिक्षा दिली जाईल. त्यांना कोणी वाचवायचा प्रयत्न करेल तर त्यांनाही शिक्षा मिळेल, अशी ग्वाहीही फडणवीस यांनी यावेळी दिली.


राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांनी मंगळवारी शून्य प्रहरात बीड शहरातील कोचिंग क्लासमधील विद्यार्थिनीचे प्राध्यापकांनीच लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारे हे कृत्य बीडमध्ये घडले आहे. या प्रकरणात आरोपी पवार आणि खटावरकर या दोघांना अटक झाली. पॉस्को अंतर्गत गुन्हा पण नोंद झाला. या दोघांच्या मागे कोणी नेते आहेत का, असा संभ्रम आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. अशा किती मुलींसोबत असे गैरकृत्य झाले आहे, याचाही तपास झाला पाहिजे. त्यामुळे या प्रकरणाची महिला आयपीएस अधिकारी नेमून एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तुपे यांनी केली.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही मागणी लगेच मान्य केली. बीडमध्ये घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. कोचिंग क्लासच्या माध्यमातून लैंगिक शोषणाची घटना घडली.

Comments
Add Comment