महापौर बंगल्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा मार्ग मोकळा

उच्च न्यायालयाने फेटाळल्या सर्व याचिका


मुंबई : दादरस्थित महापौर बंगल्यातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मोकळा केला. स्मारकाच्या निर्णयाला २०१७ मध्ये विविध याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले होते. या याचिका मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने या याचिकांवर निर्णय देताना या याचिका फेटाळल्या. आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या याचिकांवर खंडपीठाने गेल्या आठवड्यात दोन तास सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर व याचिकाकर्ते, राज्य सरकार आणि स्मारक समितीचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवला होता.


महापौर बंगल्यात होऊ घातलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला माहिती अधिकार कार्यकर्ते भगवानजी रयानी, जनमुक्ती मोर्चा या संस्थेचे अध्यक्ष मानव जोशी, पंकज राजमाची यांनी स्वतंत्र जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले होते.


महापौर बंगला पुरातन वारसा वास्तू आहे. हा परिसर किनारा नियंत्रण क्षेत्रात (सीआरझेड) मोडतो, असे असतानाही त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा घाट घातल्याचा दावा याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील उदय वारुंजीकर यांनी केला होता. स्मारक समितीवर ठाकरे कुटुंबातील दोघांना नियमांचे उल्लंघन करून आजीवन सदस्यत्व देण्यात आल्याचा दावाही वारुंजीकर यांनी केला होता.


दुसरीकडे, सर्व निकष आणि नियमांचे पालन करूनच निर्णय घेण्यात आल्याचा प्रतिदावा न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला होता.


मूळ वास्तूला धक्का नाही

महापौर बंगला पुरातन वारसा वास्तू असल्यामुळे या वास्तूला धक्का लावलेला नाही. बाळासाहेब ठाकरे स्मारक तळघरात उभारण्यात आल्याची माहिती समितीच्या वतीने वरिष्ठ वकील दरायस खंबाटा यांनी न्यायालयाला दिली. तसेच, ठाकरे स्मारक पूर्णतः तयार आहे, तथापि, हे स्मारक सर्वसामान्यांसाठी अद्याप खुले का करण्यात आले नाही, याबाबत खंबाटा यांनी आश्चर्य व्यक्त केले.
Comments
Add Comment

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची

मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ची नजर

बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणार मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील

माहिम मोरी रोड शाळेच्या पुनर्विकासाच्या भूमिपुजनाचा लवकरच वाढणार नारळ

तब्बल सात वर्षांपासून बंद करण्यात आली शाळा, दोन वर्षांपासून आहे जमिनदोस्त मुंबई (विशेष प्रतिनिधी): माहिममधील