नॅशनल हेरॉल्ड : ५० लाखात बळकावली २ हजार कोटींची मालमत्ता, राहुल आणि सोनिया गांधींसंदर्भात ईडीचा कोर्टात दावा

नवी दिल्ली: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया आणि राहुल गांधींनी ५० लाखात २ हजार कोटींची मालमत्ता बळकावल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज, बुधवारी दिल्लीच्या राऊस ऐव्हेन्यू कोर्टात केला.


ईडीच्या वतीने न्यायालयात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू म्हणाले की, नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राचे प्रकाशक असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची (एजेएल) मालमत्ता २ हजार कोटी होती.एजेएलकडे दिल्ली, लखनौ, भोपाळ, इंदूर, पंचकुला, पाटणा आणि इतर ठिकाणी मालमत्ता आहेत.


या सर्व मालमत्ता केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांनी १९४७ नंतर वृत्तपत्र छपाई आणि प्रकाशनासाठी प्रदान केल्या आहेत. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांच्यासमोर हे निवेदन सादर करण्यात आले. नॅशनल हेरॉल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या फिर्यादी तक्रारीची दखल घ्यावी की नाही याबद्दल न्यायालय युक्तिवाद ऐकत आहे. सुनावणीदरम्यान, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल राजू यांनी म्हटले की, गांधी कुटुंबाच्या जवळच्या सहकाऱ्यांना एजेएलचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पैसे वळवण्यासाठी फसवे व्यवहार करण्यात आले होते. या प्रकरणीची सुनावणी गुरुवारीही सुरू राहणार आहे.

Comments
Add Comment

मोदींचा विरोधकांवर थेट हल्लाबोल, येत्या काळात काँग्रेसमध्ये पडू शकते फुट?

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर दणदणीत विजय मिळला. तर बिहारमधील २४३ जागांपैकी

तेजस्वी यादव विजयी, तर तेजप्रताप पराभूत

पटना : बिहार निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. एनडीए २४३ पैकी २०२ जागांसह विक्रमी विजयाकडे वाटचाल करत आहे, तर

मुस्लीमबहुल भागात एनडीएची सरशी

पटना : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने

पर्यावरणवादी पद्मश्री सालूमरदा थिमक्का यांचे निधन

वयाच्या ११४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास नवी दिल्ली : प्रसिद्ध पर्यावरणवादी, पद्मश्री पुरस्कार विजेत्या

बिहारच्या निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस-उबाठा सेनेत कलगीतुरा

अंबादास दानवे यांच्या टीकेला भाई जगताप यांचे प्रत्त्युतर मुंबई  : मतमोजणीदरम्यान बिहारमध्ये कोणाचे सरकार

जम्मू-काश्मिरच्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट! फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांची तपासणी करताना उडाला भडका

श्रीनगर: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील स्फोट प्रकरण ताजे असतानाच जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमधील नौगाम