शासकीय कार्यालयात 'बर्थडे केक' कापणाऱ्यावर होणार कारवाई

  88

मुंबई : शासकीय कार्यालयात आता अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करणे, केक कापणे, सेल्फी, फोटोसेशन करणे महागात पडणार आहे.याबाबत आता राज्य शासनाने कडक भूमिका घेत 'महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९'च्या अनुषंगाने परिपत्रक जारी केले आहे. कार्यालयीन वेळेत, कार्यालयीन जागेवर वैयक्तिक समारंभ घेणे, हा शिस्तभंग मानला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


राज्य शासनाने जारी केलेल्या नियमानुसार, कोणताही सरकारी कर्मचारी कार्यालयीन वेळ आणि ठिकाणी अशासकीय, वैयक्तिक, धार्मिक वा सामाजिक कार्यक्रम आयोजित करू शकत नाही. नियम क्रमांक ४, ५ व २२ अंतर्गत कर्मचाऱ्यांकडून शिस्तबद्ध, पारदर्शक आणि लोकाभिमुख वर्तणूक अपेक्षित आहे.परिपत्रकानुसार या नियमांचे उल्लघंन केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांची प्रशासकीय चौकशी होऊ शकते. त्यानंतर समज देणे, लेखी तडकाफडकी तक्रार, पदोन्नती थांबवणे, निलंबन किंवा सेवासमाप्ती यांसारखी शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. शासनाने संबंधित विभागप्रमुखांना याबाबत कठोर सूचना दिल्या आहेत.



कार्यालयीन वेळेत 'सेलिब्रेशन'चा बेत आखला जातो. कामाच्या वेळेतच मोठ्या उत्साहात केक कापला जातो. कर्मचारी तासाभरासाठी काम बाजूला ठेवतात. काही ठिकाणी संगीत आणि मोबाइल व्हिडीओ शूटिंगही सुरू असते.यामुळे दैनिक भेटींसाठी आलेल्या नागरिकांच्या कामांना संबंधित कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वाढदिवस सेलिब्रेशन खोळंबा ठरत आहे. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण होत आहे. शासनाने ठरवून दिलेली कार्यालयीन वेळ ही लोकसेवेसाठी आहे, वैयक्तिक सोहळ्यांसाठी नाही, याचे भान संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी ठेवण्याची गरज आहे.त्यामुळे राज्य शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments
Add Comment

पेंग्विनच्या देखभालीवर २५ कोटी खर्च

मुंबई (प्रतिनिधी) : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहायलातील (राणीची बाग)

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता भुयारी बोगद्याचा मार्ग मोकळा

मुंबई: मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा

मातोश्रीकडे डुप्लिकेट शिवसेना

मुंबई : खरी शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे डुप्लिकेट शिवसेना आहे. त्यांनी अडीच

राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान - एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याच्या निर्णयावर शासन ठाम असून, संबंधित

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - अजित पवार

मुंबई : शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातले सरकार शेतकऱ्यांचेच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी

पंढरपूर वारीत अर्बन नक्षलींचा शिरकाव, कारवाईची मागणी

विधान परिषदेत शिवसेना आमदाराने उठवला मुद्दा, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आश्वासन मुंबई : महाराष्ट्राची