सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे आज नकारात्मक परिणाम उद्भवला आहे. सकाळी वाढ झालेल्या दोन्ही निर्देशांकात अखेरीस अनुक्रमे ०.०७%,०.१८% घसरण झाली आहे. निफ्टी मिड कॅपमध्ये मात्र ०.१% वाढ झाली आहे तर स्मॉलकॅपमध्ये ०.१०% घसरण झाली आहे.
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) मध्ये 'Flat' संकेत अधिक मिळत संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. विशेषतः बाजारातील विशिष्ट क्षेत्रीय परिणामांचा परिणाम शेअर बाजारावर कायम राहिला आहे. क्षेत्रीय निर्देशांकात सर्वा धिक वाढ मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.८५%), तेल व गॅस (०.४९%), पीएसयु बँक (०.७१%), मेटल (०.३१%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण मिडिया (१.३१%), एफएमसीजी (०.६९%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.२४%), आयटी (०.३०%), फायनांशियल सर्विसेस (०.३२%) समभागात झाले आहे.
आज शेअर बाजारातील अखेरीस तेजीचा अंडरकरंट कायम होता. प्रामुख्याने बाजारातील फंडामेंटल मजबूत असल्याने याचा फायदा सातत्याने बाजारात होत आहे. तज्ञांनीही आज परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी रोख खरेदीत वाढ करू शकतात असे म्हटले होते. कच्च्या तेलाच्या निर्देशांकात वाढ होण्याचे संकेत मिळत असताना ओपेकचा निर्णयानंतर भारताला दिलासा मिळाला होता. त्याच धर्तीवर आज तेल व गॅस समभागात वाढ झाली आहे.
जर बाजारातील एकूण समभागाचा विचार केल्यास, बीएसईत ४१६४ शेअर्सपैकी २०२१ शेअर तेजीत व १९८९ शेअर मंदीत राहिले आहेत. एनएसईत ३०२० शेअर्समध्ये १४९१ शेअर तेजीत तर १४५२ शेअर मंदीत राहिले आहेत. एनएसईतील एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ४५९.२३ लाख कोटी रुपये झाले आहे. बीएसईतील बाजार भांडवल ४६१.२९ लाख कोटीवर पोहोचले आहे. सकाळी बीएसईत ८३८७४ वर इंट्राडेने उच्चांक गाठल्यावर अखेर बीएसई ८३६६९७.२९ पातळीवर पोहोचला आहे. एनएसईत दिवसभरात इंट्राडेने २५५९३.४० पातळी गाठली होती.
आज आंतरराष्ट्रीय बाजारातील संमिश्र प्रतिसाद पाहता कालच्या तेजीच्या तुलनेत आजही नफा बुकिंग झाल्याचे संकेत आहेत. प्रामुख्याने अमेरिकन बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात न झाल्याने तसेच यासंदर्भात लवकरच विधान येणे अपेक्षित असल्याने अमेरिकन बाजारात काल वाढ झाली होती. आजही सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्समध्ये ०.०५% किरकोळ घट झाली आहे तर एस अँड पी ५०० मध्ये ०.५२%, नासडाक (NASDAQ) मध्ये ०.४७% वाढ झाली आहे. आशियाई बाजारातील निकेयी २२५ मध्ये १.२५% घसरण वगळता बहुतांश बाजारात सुरूवातीच्या कलात वाढ झाली आहे ज्यामध्ये शांघाय कंपोझिट (०.३९%), सेट कंपोझिट (१.८४%), तैवान वेटेड (१.३२%) या बाजारांचा समावेश आहे.
मध्यपूर्वेकडील युद्धविरामानंतर सोन्याच्या व कच्च्या तेलाच्या निर्देशांकात घसरण सातत्याने झाली मात्र ओपेकने दर नियंत्रित करण्याच्या निर्णयानंतर कच्च्या तेलाची किंमत स्थिर राहिली असली तरी डॉलरच्या घसरणीनंतर, तसेच अमेरिकन बाजारातील कामगार रोजगार आकडेवारी प्रकाशित होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सोन्याएवजी स्थावर मालमत्तेला प्राधान्य दिल्याने सोन्याचे दर वाढले आहेत. कच्च्या तेलाच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.८५% वाढ झाली आहे तर सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात १.५६% वाढ झाली आहे. भारतीय बाजारातील एमसीएक्समधील सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.२१% वाढ झाली होती. तर एमसीएक्सवरील चांदीच्या निर्देशांकातही १.०९% वाढ झाली आहे.कच्च्या तेलाच्या Brent Future निर्देशांकात मध्ये ०.३७%, WTI Futures निर्देशांकात ०.८६% वाढ झाली आहे. कच्च्या तेलाची किंमत भारतात ०.८४% वाढून ५६३० रूपये प्रति बॅरेलवर पोहोचली आहे. काल ती ५६११ रूपये प्रति बॅरेल होती. रिलायन्स, बीईएल, एचडीएफसी बँक यांसारख्या समभागात झालेल्या हेवीवेट ब्लू चिप्स कंपन्यामधील वाढीमुळे बाजारातील घसरगुंडी रोखून सपोर्ट लेवल राखण्यास मदत झाली आहे. आयसीआयसीआय बँक,अॅक्सिस बँक आणि टीसीएसच्या शेअर्समधील तोट्यामुळे सपोर्ट लेवल घसरण असताना एचडीएफसीसारख्या शेअर वाढीमुळे बहुतांश प्रमाणात निर्देशांकातील तूट भरून निघाली आहे, त्यामुळे देशांतर्गत बाजारातील बेंचमार्क वरच्या पातळीवर राहिले आहेत.
आज अखेरच्या सत्रात ब्लू डार्ट एक्स्प्रेस (७.१५%), रेमंड (६.७१%), आयडीएफसी फर्स्ट बँक (६.०४%), सिटी युनियन बँक (५.०४%), आरबीएल बँक (४.६४%), एचबीएल इंजिनियरिंग (४.६४%), जेपी पॉवर वेंचर (४.२६%), ब्लू स्टार (४.२४%), अपोलो हॉस्पिटल (३.५१%), भारत इलेक्ट्रॉनिक्स (२.५५%), पंजाब नॅशनल बँक (२.३३%), सिमेन्स (२.२०%), रिलायन्स इंडस्ट्रीज (१.८५%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (१.३२%), एशियन पेंटस (१.२१%), आयसीआयसीआय लोमबार्ड (१.१५%), वेदांता (१.१०%), कॅनरा बँक (१.०७%), जियो फायनांशियल सर्विसेस (०.८७%) समभागात वाढ झाली आहे.
सर्वाधिक घसरण कोरोमंडलम इंटरनॅशनल (७.१७%), गो डिजिट जनरल (५.१%), जेएस डब्लू होल्डिंग्स (४.९९%), होम फर्स्ट फायनान्स (४.२४%), हिताची एनर्जी (३.५८%), गोदरेज इंडस्ट्रीज (३.१५%), झी एंटरटेनमेंट (२.९१%), अजंता फार्मा (२.७७%), इन्फोऐज इंडिया (२.६१%), नेस्ले इंडिया (२.२४%), एक्सिस बँक (२.१६%), एबीबी इंडिया (२.१५%), युनायटेड स्पिरीट (१.९४%), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (१.८४%), मदर्सन (१.७३%), श्रीराम फायनान्स (१.४७%), इटर्नल (१.१९%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले की,' आज आपला industrial products चे तिमाहीचे आकडे जाहीर झाले. अनुमानापेक्षा खुपच खराब आकडे आले. इकडे अमेरिकेतील संसदेत रशिया मधून कच्चे तेल घेत असलेल्या देशांना ५००% टेरिफ लावावे या वृत्ताने जोर घरला. तसेच ९ जुलैपासून नवीन टैरिफ येणार का नाही या सर्व बातम्या नकारात्मक असल्याने बाजार सुरुवात चांगली करूनही तेजी टिकवु शकला नाही. जेमतेम ९० अंकाने सेन्सेक्स वाढला आहे.२५५०० च्या वरती बाजार फारसा टिकत नाही. टेक्निकली बाजारात थोडे करेक्शन येईल असं दिसतंय.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' मागील आठवड्यातील तीव्र वाढीनंतर बाजार एकत्रीकरणाच्या टप्प्यात प्रवेश करत असताना बाजारात अस्थिरता आणि श्रेणी-बाउंड सत्र दिसून आले. निफ्टी ५० हा १०० अंकांच्या अरुंद बँडमध्ये चढला आणि नंतर किरकोळ वाढीसह स्थिरावला, दिवसाचा शेवट २४ अंकांनी किंवा ०.१०% ने वाढून २५,५४१.८० वर झाला. क्षेत्रीय कामगिरी मिश्रित होती,सार्वजनिक क्षेत्रातील बँका अव्वल कामगिरी करणाऱ्या म्हणून उदयास आल्या, ०.७% वाढल्या, पायाभूत सुविधा आणि धातू काउंटरमधील मजबूतीमुळे. याउलट, नफा बुकिंगमुळे मीडिया शेअर्स १.३% ने खाली आले, तर एफएमसीजी,आयटी आणि ऑटो कंपन्यांनाही विक्री चा दबाव सहन करावा लागला. बाजारातील व्यापक हालचाली मंदावल्या गेल्या, निफ्टी मिडकॅप १०० आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० दोन्ही निर्देशांक बाजूला सरकले आणि अखेर स्थिर बंद झाले, जे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण दर्शवते.'
बाजारातील निफ्टी हालचालींवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'मंगळवारी निर्देशांक एका श्रेणीत व्यवहार करत होता आणि किरकोळ वाढीसह बंद झाला. तो मागील सत्र किंमत श्रेणीतच राहिला जो स्टॉक विशिष्ट हालचालींमुळे एकत्रीकरणाचे संकेत देत आहे.निर्देशांक सध्या २५,५००- २५,४०० च्या समर्थन क्षेत्रा (Support Level)जवळ आहे.या क्षेत्राच्या वर राहिल्याने तेजीची गती कायम राहू शकते, ज्यामुळे निफ्टीला २५,९००-२६,००० च्या पातळी कडे ढकलण्याची शक्यता आहे, जे अलीकडील ६ आठवड्यांच्या २४५००- २५२०० श्रेणीच्या ब्रेकआउट क्षेत्रावर आधारित आहे. तथापि, २५,४०० च्या खाली घसरण झाल्यास निरोगी रिट्रेसमेंट किंवा एकत्रीकरण होऊ शकते, निर्देशांक २५२ ००-२५७०० च्या विस्तृत श्रेणीत जाण्याची शक्यता आहे.
अलिकडच्या वाढीमुळे बाजारपेठेतील मजबूत रुंदी आणि व्यापक-आधारित क्षेत्रांचा सहभाग (Broad Sector Participation) दिसून आला आहे ज्यामुळे रॅलीच्या संरचनात्मक ताकदीत (Structural Strength) भर पडली आहे. मुख्य स्थितीत्मक आधार २५२००–२५१०० वर आहे - ब्रेकआउट झोनची वरची सीमा - जी आता समर्थन पातळी म्हणून काम करू शकते, ध्रुवीयता दर्शवते (Showing Polarity) जिथे मागील प्रतिकार समर्थनात बदलतो.'
आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' बँक निफ्टीने सलग दुसऱ्या सत्रात दैनिक चार्टवर उच्च लाट मेणबत्ती तयार केली, जी स्टॉक-विशिष्ट ट्रेक्शन दरम्यान वेळेनुसार एकत्रीकरणाचा टप्पा सूचित करते. उल्लेखनीय म्हणजे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांची उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली, ज्यामुळे व्यापक बँकिंग क्षेत्राला सापेक्ष ताकद मिळाली.निर्देशांक सध्या त्याच्या ५७,०००-५६,८०० च्या तात्काळ समर्थन क्षेत्राच्यावर आहे. या मागणी क्षेत्राच्या वर टिकून राहिल्याने अल्पकालीन पूर्वाग्रह रचनात्मक राहील, ज्यामुळे ५८,५०० च्या दिशेने संभाव्य हालचालीचा मार्ग मोकळा होईल.५६,००० आणि ५३,५०० मधील अलिकडच्या एकत्रीकरण बँडच्या मोजलेल्या हालचाली प्रक्षेपणातून प्राप्त झालेली पातळी होती.
उलटपक्षी, ५६,८०० च्या खाली खंड पडल्यास अलिकडच्या वाढीचे सुधारात्मक एकत्रीकरण होऊ शकते. निर्देशांक ५६,०००-५७,६०० च्या विस्तृत एकत्रीकरण क्षेत्राच्या आत दोलन होण्याची शक्यता आहे.स्ट्रक्चरल सपोर्ट ५६,०००-५५,८०० क्षेत्रासाठी रीकॅलिब्रेट (Recalibrate) केला जातो जो प्रमुख तांत्रिक निर्देशकांचा संगम दर्शवितो — ज्यामध्ये ५०-दिवसांचा ईएमए (Exponential Moving Average EMA)आणि अलीकडील रॅलीचा ६१.८% फिबोनाची रिट्रेसमेंट (५५१४९ -५७६१४) यांचा समावेश आहे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,' गेल्या आठवड्यात भू-राजकीय तणाव कमी झाल्यामुळे आणि संभाव्य अमेरिकेतील व्यापार कराराबद्दल आशावाद निर्माण झाल्यामुळे झालेल्या जोरदार तेजीनंतर, देशांतर्गत निर्देशांक एका मर्यादित मर्यादेत व्यवहार करत होते. ९० दिवसांचा विराम संपत येत असताना, गुंतवणूकदार घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, अमेरिकेतील शुल्काबाबत स्पष्टता शोधत आहेत. याव्यतिरिक्त, बाजारातील भावना टिकवून ठेवण्यासाठी देशांतर्गत उत्पन्न वाढीवरील विश्वास महत्त्वाचा आहे, पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या (तिमाही निकाल) Q1FY26 निकालांमुळे अधिक अंतर्दृष्टी मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, अनुकूल मान्सून, घसरणारा महागाई, सौम्य कच्च्या तेलाच्या किमती आणि मागणी वाढवण्यासाठी सरकारी प्रयत्नांसह अनेक टेलविंड्स (Tailwinds) गुंतवणूकदारांच्या भावनांना सतत पाठिंबा देतील अशी अपेक्षा आहे.'
बाजारातील सोन्याची पातळीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले,' डॉलरच्या कमकुवतपणामुळे किमतींना आधार मिळत राहिल्याने सोन्याचा भाव सकारात्मक राहिला. कॉमेक्स गोल्ड ३० डॉलरने वाढून ३३४५ डॉलरवर पोहोचला, तर एमसीएक्स गोल्ड १२०० ने वाढून ९७,३०० रूपयांच्या आसपास स्थिरावला.या आठवड्यात भाव तेजीत आहे, कारण अमेरिकेतील प्रमुख आर्थिक डेटा, विशेषतः बिगर-शेती वेतन, बेरोजगारीचे आकडे आणि एडीपी बिगर-शेती (Non Agricultural ) रोजगार बदल यांच्या अपेक्षा आहेत. डॉलरच्या कमकुवतपणात सहभागींच्या किंमती वाढत असल्याने, सोन्याला सुरक्षित-निवासस्थान खरेदी आकर्षित करणे सुरूच आहे. सोन्याची किंमत श्रेणी ९६,५०० - ९७,८५० रूपयांवर आणि ३३१० पर्यंत ३३७५ डॉलरपर्यंत अपेक्षित आहे.'
आजच्या बाजारातील स्थिती पाहता अमेरिकेतील नव्या डेटा आधारे तसेच मध्यपूर्वेकडील परिस्थितीवर अवलंबून बाजारातील पुढील हालचालीवर गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रित केले असून लवकरच जाहीर होणारे कंपन्यांचे तिमाही निकाल (Q3 Results)पाहणे गुंतवणूकदारांना फायद्याचे ठरू शकते.