भारतीय नौदलाने तातडीने कारवाई केली आणि जहाजाला लागलेली आग विझवली. यामुळे समुद्रात संकटात सापडलेले जहाज वाचले.
पलाउ देशाचा ध्वज असलेली नौका
प्रशांत (पॅसिफिक) महासागरातील पलाउ हा छोटा देश आहे. पलाउ फिलिपाईन्सच्या पूर्वेला ८०० किमी व जपानच्या दक्षिणेला ३२०० किमी अंतरावर आहे. या देशाचा ध्वज असलेली 'एमटी यी चेंग' नावाची तेलवाहक नौका अरबी समुद्रातून प्रवास करत होती. या प्रवासादरम्यान तेलवाहक जहाजाला आग लागली. आग लागल्यामुळे जहाजावरील विजेचा पुरवठा ठप्प झाला. भारतीय नौदलाने तातडीने मतकार्य सुरू केले. या मदतीमुळे जहाज आणि जहाजावरील क्रू सुरक्षित आहे. आग विझविण्यात आली आहे. आयएनएस तबरवरील नौसैनिक आणि 'एमटी यी चेंग' जहाजावरील अधिकारी - कर्मचारी यांनी संयुक्त कारवाई करुन जहाजाच्या इंजिन रूमला लागलेली आग विझवली.
जहाजावरील सर्व कर्मचारी भारतीय वंशाचे
'एमटी यी चेंग' या तेलवाहक जहाजावरील सर्व १४ अधिकारी - कर्मचारी हे भारतीय वंशाचे आहेत. भारतीय नौदलाने या सर्वांना वाचवले आहे.