
नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची पत्नी हसीन जहा आणि मुलगी आयराला दर महिन्याला चार लाख रूपये देण्याचे आदेश दिले आहेत. मोहम्मद शमीला हे रूपये महिन्याच्या मेंटेनन्ससाठी द्यावे लागतील. शमीच्या या केसची सुनावणी २१ एप्रिल २०२५मध्ये झाली होती. यावर आज १ जुलैला निर्णय देण्यात आला.
मोहम्मद शमीला द्यावे लागतील लाखो रूपये
कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शमीला आदेश देण्यात आलेत की, उदरनिर्वाहासाठी त्याला आपल्या पत्नीला दर महिन्याला १ लाख ५० हजार रूपये द्यावे लागतील. सोबतच शमी आणि हसीन जहा यांची मुलगी आयराच्या महिन्याचा खर्च देण्याचेही आदेश न्यायालयाने दिलेत. शमीला आयरासाठी दर महिन्याला २ लाख ५० हजार रूपये पाठवावे लागतील.
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्यातील हे प्रकरण सात वर्षे जुने आहे. याच कारणामुळे शमीला ही रक्कम गेल्या सात वर्षाच्या हिशेबाप्रमाणे द्यावी लागेल. शमीला दर महिन्याचे चार लाख या हिशेबाने सात वर्षांचे साधारण ३ कोटी ३६ लाख रूपये आपली पत्नी आणि मुलीला द्यावे लागतील.