GST Collection: जीएसटी अप्रत्यक्ष कर संकलनात रेकॉर्डब्रेक वाढ 'इतके' लाख कोटी झाले Collection

  55

प्रतिनिधी: ३० जूनला सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार,देशातील स्थूल जीएसटी संकलनात (Gross GST Collection) यामध्ये रेकोर्डब्रेक वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) मध्ये ९.४% एवढी घसघशीत वाढ झाल्याने जीएसटी संकलनात २२.०८ लाख कोटींची वाढ झाली आहे. गेल्या ५ वर्षांतील ही सर्वाधिक वाढ झाल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले होते. ' आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये २०२४-२५ मध्ये, जीएसटीने आतापर्यंतचा सर्वाधिक २२.०८ लाख कोटींचा सकल संग्रह नोंदवला,  जो वार्षिक ९.४ टक्के वाढीचे प्रतिबिंब आहे. सरासरी मासिक संग्रह १.८४ लाख कोटी होता' असे सरकारने आपल्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे.


यामुळे महसूलात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अप्रत्यक्ष करप्रणालीतील (Indirect Taxes) महसूलात लक्षणीय वाढ झाल्याचे या प्रेसनोटमध्ये म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये जीएसटी संकलनात २२.०८ लाख कोटींचा झाला आहे. सरासरी महिन्यातील संकलनाची पातळी १.८४ लाख कोटीवर पोहोचली आहे.यापूर्वी आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर एकूण संकलन ११.३७ कोटींचे झाले होते. तसेच सरासरी मासिक संकलन (Collection) ९५००० कोटींचे झाले होते. यापूर्वी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये जीएसटी संकलन १४.८३ लाख कोटीवर पोहोचले होते.


प्रेसनोटमध्ये म्हटल्याप्रमाणे, करदात्यांच्या संख्येतही वाढ होत ३० एप्रिल २०२५ पर्यंत नोंदणी संख्या १.५१ कोटींवर पोहोचली आहे. याशिवाय प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,' जीएसटी लागू झाल्यापासून, वस्तू आणि सेवा कराने महसूल संकलनात आणि कर पायाच्या विस्तारात चांगली वाढ दर्शविली आहे. यामुळे भारताची आर्थिक स्थिती स्थिरपणे मजबूत झाली आहे आणि अप्रत्यक्ष कर अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक बनला आहे," असे जीएसटी आठवा वर्धापन दिनानिमित्ताने म्हटले आहे.

Comments
Add Comment

भूकंपानंतर आता रशियात ज्वालामुखीचा उद्रेक! राखेचे लोट ६,००० मीटर उंचीपर्यंत

मॉस्को: रशियाच्या कामचटका प्रांतातील Petropavlovsk येथे ८.८ तिव्रतेचा भीषण भूकंप झाल्यानंतर आता याच ठिकाणी ज्वालामुखीचा

शिंदेंनी शिवसेना का सोडली ? मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

मुंबई : विधान परिषदेच्या २०२२ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेत दोन गट झाले. हे असे का झाले एकनाथ शिंदे पक्ष नेत्यांशी न

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

'हिंदूंना बदनाम करण्याचा काही राजकारण्यांचा कट'

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांच्या निवडक नेत्यांनी हिंदूंना बदनाम

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची