Tuesday, July 1, 2025

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू
शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले.

विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशीजवळील चिन्ना कामनपट्टी गावात एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला. स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले. जखमींवर विरुधुनगर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक उपस्थित आहे. दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
Comments
Add Comment