भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला आहे. निर्दयीपणे खून करून फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्लीतून अटक केली आहे.
२८ मे २०१२ रोजी भाईंदर पूर्वेतील साई सिना पार्क, साईबाबा नगर, नवघर रोड येथे राहणा-या सुरेशकुमार सूर्य नारायण चौधरी या ३५ वर्षीय व्यक्तीची त्याच्याच घरात अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. आरोपीने इलेक्ट्रिक इस्त्रीच्या वायरने त्याचा गळा आवळला, तोंडावर चिकटपट्टी लावली आणि त्यानंतर खलबत्त्याच्या लोखंडी दांड्याने डोके आणि तोंडावर बेदम मारहाण केली. यातूनही समाधान न होता आरोपीने कटर, चाकू आणि इतर धारदार हत्यारांनी त्याच्या तोंडावर, छातीवर, पोटावर आणि हातावर अनेक वार केले. सर्वात क्रूर म्हणजे त्याने पीडित व्यक्तिचे गुप्तांग कापून गंभीर जखमा करून शेवटी त्याचा जीव घेतला.
ढाका : ३५ हजारांचं कर्ज असल्याने हिंदू महिलेला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची गंभीर घटना बांगलादेशात घडली आहे. या महिलेने आणि तिच्या ...
या भयानक गुन्ह्याची नोंद २८ मे २०१२ रोजी नवघर पोलीस ठाण्यात झाली. गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीराच्या पथकाने वरिष्ठांच्या सूचनेनुसार या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकाने वेळोवेळी बिहारला जाऊन मोहीम राबवली परंतु तो सापडत नव्हता. अखेर उपलब्ध साक्षीदार आणि गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे पथकाने दिल्लीत त्याचा मागोवा घेतला आणि यशस्वीपणे त्याला ताब्यात घेतले.
गुन्हा दाखल झाल्यापासूनच आरोपी गोविंद कुमार पुत्र हरक उर्फ जगतनारायण चौधरी हा आपली ओळख आणि अस्तित्व लपवून फरार झाला होता. तो सध्या ३४ वर्षांचा असून दिल्लीतील अरिहंत एंटरप्राईजेस, पत्तेवाली गल्ली, नया बाजार, न्यू दिल्ली येथे राहत होता.
प्राथमिक चौकशीत आरोपीचा या खुनातील सक्रिय सहभाग स्पष्ट झाला आहे. तो गुन्हा केल्यापासून दिल्ली आणि बिहार या ठिकाणी आपली खरी ओळख लपवून वास्तव्य करत होता. आरोपीला अटक करून पुढील कारवाईसाठी नवघर पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केले आहे आणि गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे.
ही महत्त्वाची कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे अविनाश अंबुरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखा कक्ष-१ काशिमीराचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, संदीप शिंदे, सहायक फौजदार अशोक पाटील, अविनाश गर्जे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, पोलीस हवालदार मनोज चव्हाण, सचिन हुले, सुधीर खोत, अश्विन पाटील, सनी सुर्यवंशी, पोलीस शिपाई प्रशांत विसपुते, गौरव बारी, सौरभ इंगळे, धिरज मेंगाने म.सु.ब. किरण आसवले तसेच सहायक फौजदार संतोष चव्हाण सायबर गुन्हे शाखा आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने या प्रकरणात अथक मेहनत घेऊन १३ वर्षांनी न्याय मिळवून दिला आहे.
या गुन्ह्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि आता आरोपीच्या अटकेमुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे हे स्पष्ट झाले आहे की कितीही वेळ लागला तरी न्याय मिळवूनच दिला जातो.