गणपतीत तुमची कारही जाणार रेल्वे मार्गावरून

कोकण रेल्वे देणार 'रो-रो' सेवा


मुंबई (प्रतिनिधी) :कोकण रेल्वे महामंडळ येत्या गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास रोल ऑन रोल ऑफ रेल्वे सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे. ही सेवा कार वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती केआरसीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी दिली. झा यांनी स्पष्ट केले की, "जर किमान ४० कार एकावेळी वाहतूक करण्यासाठी उपलब्ध झाल्या, तर आम्ही ही विशेष सेवा नक्की सुरू करू. "असे ते म्हणाले.


कोकण रेल्वेची रो-रो सेवा प्रामुख्याने ट्रक वाहतुकीसाठी वापरली जाते, जिथे वाहन चालकही स्वतःच्या वाहनासोबत प्रवास करू शकतो. मात्र, कार वाहतुकीसाठी रो-रो सेवा यापूर्वी सुरू करण्यात आलेली नव्हती. "मला कल्पनाच नव्हती की लोकांना त्यांची महागडी कार ७५० किमी दूर नेण्याची गरज भासते," असे सांगत, ते म्हणाले की, कार वाहतुकीसाठी विशिष्ट डब्यांत बदल करावे लागतील.
२०२३-२४ या आर्थिक वeर्षात कोकण रेल्वेने ३०१ कोटींचा नफा कमावला आहे.


कोविड काळातील दोन वर्षे वगळता महामंडळ सातत्याने नफ्यात आहे. मागील १५ महिन्यांत महामंडळाने ३१५० कोटींचे प्रकल्प निविदेद्वारे मिळवले असून सध्या ४०८७ कोटींचे प्रकल्प कार्यान्वित आहेत. "या वर्षात आम्ही १५००० कोटींचे नवीन ऑर्डर्स मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते साध्य होईल," असं झा यांनी सांगितले. सध्या संपूर्ण कोकण रेल्वे मार्ग एकेरी असून, केवळ ४७ किमीचा भाग दुहेरी आहे. उर्वरित मार्गासाठी ५१०० कोटींचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.



८ थांबे पुन्हा सुरू होणार ?


कोविड काळात बंद करण्यात आलेले ८ स्थानक थांबे पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच, पर्नेम व ओल्ड गोवा बोगद्यांसाठी पर्यायी मार्गाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून कार्यवाटपाची प्रतीक्षा असल्याचंही झा यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

मुंबईतील इतर भागांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कधी होणार कारवाई ?

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कुलाबा कॉजवेवरील अनधिकृत फेरीवाले हटवले मुंबई (खास प्रतिनिधी) : कुलाबा कॉजवेवरील

मेट्रोंना विविध सेवा देणारी आता एकच कंपनी

मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्रदेशातील विविध प्राधिकरण आणि कंपन्यांचे मेट्रो प्रकल्पांचे एकत्रिकरण

रविवारी मुख्य व हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी रविवारी ९ नोव्हेंबर रोजी उपनगरी

कृषी समृद्धी योजनेस राज्य सरकारची मान्यता

मुंबई (प्रतिनिधी) : "कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निर्मितीसाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय

एमसीए निवडणुकीचा मार्ग मोकळा

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीतील अंतिम उमेदवार यादीवर आक्षेप घेत एमसीएच्या काही

मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी

मुंबई (प्रतिनिधी): हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या रविभवन येथील मंत्र्यांच्या बंगल्यांवर